नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन अंतराळवीरांनी भारतीय नागरिकांना अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रशियन अंतराळवीरांनी भारतीय तिरंगा हातात धरून अंतराळ संशोधनातील दोन्ही देशांमधील अतुट भागीदारीवर भर दिला. एका व्हिडिओ संदेशात त्यांनी भारताचे अभिनंदन करून मॉस्को आणि नवी दिल्ली यांच्यातील दशकांपासूनच्या सहकार्याची आठवण काढली, तसेच अंतराळ संशोधन हा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधाचा मुख्य खांब असल्याचे सांगितले. या व्हिडिओ संदेशात अंतराळवीर प्योतर दुब्रोव म्हणाले, "प्रिय मित्रांनो, आज प्रजासत्ताक भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे." त्यांनी भारतीय जनतेला शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख ठरलेल्या 'ॲनिमे' आणि 'व्हिडिओ गेम्स'च्या ...
युरी गागारिन यांच्या ऐतिहासिक प्रवासाची ६५ वर्षे
अंतराळवीरांनी स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा मानवी अंतराळ उड्डाणातील एका महत्त्वाच्या टप्प्याशी जोडला. या वर्षी सोव्हिएत अंतराळवीर युरी गागारिन हे अंतराळात जाणारे पहिले मानवी व्यक्ती ठरल्याच्या घटनेला ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. नोव्हेंबर १९६१ मध्ये गागारिन यांनी भारताला भेट दिली होती आणि ती भेट भारत-सोव्हिएत मैत्रीचे एक ऐतिहासिक प्रतीक बनली होती. भारताविषयी युरी गागारिन यांनी काढलेल्या गौरवोद्गारांना उजाळा देताना अंतराळवीरांनी सांगितले की, "अंतराळातून भारत सुंदर दिसतोच, पण पृथ्वीवर आल्यावर तो 'खऱ्या मित्रांचे' घर म्हणून आणखी सुंदर भासतो." अंतराळवीर अन्ना किकिना यांनी नमूद केले की, भारताच्या महत्त्वकांक्षी 'गगनयान' मानवी अंतराळ मोहिमेमुळे ही भागीदारी आता एका नव्या आणि उच्च टप्प्यात प्रवेश करत आहे. भारताच्या पहिल्या मानवी मोहिमेच्या तयारीसाठी भारतीय अंतराळवीरांना रशियातील प्रसिद्ध 'युरी गागारिन कॉसमोनॉट ट्रेनिंग सेंटर'मध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) वरिष्ठ ...
'आर्यभट' ते 'गगनयान'
भारत आणि रशियामधील अंतराळ सहकार्याचा इतिहास अत्यंत समृद्ध राहिला आहे. १९७५ मध्ये सोव्हिएत युनियनने भारताचा पहिला उपग्रह 'आर्यभट' यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित केला आणि या सहकार्याची पायाभरणी झाली. १९८४ मध्ये जवळपास एका दशकानंतर, राकेश शर्मा हे सोव्हिएत अंतराळयान 'सोयुझ टी-११' द्वारे अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले, ज्यामुळे हे संबंध आणखी दृढ झाले.
मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे. रशियातून हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग ...
'भारत-रशिया मैत्री अमर राहो'चा नारा
भारत आणि रशियामधील अंतराळ सहकार्यानिमित्त 'रॉसकॉसमॉस' (रशियन अंतराळ संस्था), भारतातील त्यांचे कार्यालय आणि 'इस्रो' यांच्या वतीने एका संयुक्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेती आकर्षक चित्रे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांसोबत अंतराळ स्थानकात प्रदर्शित करण्यात आली. या विशेष प्रसंगी अंतराळवीर आंद्रे फेद्याएव यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारतीय ध्वज दिमाखात उंचावून "भारत-रशिया मैत्री अमर राहो," अशी घोषणा केली.