GT vs CSK : प्लेऑफसाठी करो या मरो! आज गुजरात-चेन्नईमध्ये निर्णायक लढत

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज (21 मे) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हायहोल्टेज सामना रंगणार आहे. हा आयपीएल २०२६ चा ६६ वा साखळी सामना असून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसकेसाठी हा सामना डु ऑर डाय ठरणार आहे. चेन्नईने आतापर्यंत १३ पैकी ६ सामने जिंकले असून संघ १२ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सीएसके ला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने 13 पैकी 8 सामने जिंकत 16 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.


हेड टू हेडमध्ये गुजरातची आघाडी


IPL इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 9 सामने झाले आहेत. यात गुजरातने 5 आणि चेन्नईने 4 सामने जिंकले आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईचा 8 विकेट्सने पराभव केला होता.


पिच रिपोर्ट


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. सपाट विकेटमुळे मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळण्याची शक्यता आहे.


दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-12


गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, राशिद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.


चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मुकेश चौधरी.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील