Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटची भेट दिली.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरून तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी याला 'Melodi ट्रेंड' असं नाव दिलं आहे. मात्र या ट्रेंडचा सध्या पार्ले कंपनीला चांगलाच फायदा झाला आहे. (Melody Trend and Parle Shares)



शेअर बाजारात पार्ले कंपनीची हवा :


">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारले कंपनीच्या मेलोडीची भेट दिल्यानं शेअर बाजारात वेगळाच ट्रेंड पाहायला मिळाला. शेअर बाजारात पारले इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांनी पैशांचा पाऊस पाडला. नरेंद्र मोदी यांनी मेलोडी चॉकलेट भेट देताच शेअर बाजारात पारले इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. (Melody Trend and Parle Shares)




नाव एका कंपनीचं फायदा मात्र दुसऱ्या कंपनीला :


पारले कंपनीच्या शेअर्सला आज अप्पर सर्किट लागलं. मात्र, पारले इंडस्ट्रीज लिमिटेड आणि पारले प्रोडक्टस या दोन वेगळ्या कंपन्या आहेत. पारले प्रोडक्टस ही कंपनी ९७ वर्ष जुनी आहे. या कंपनीची सुरुवात मोहनलाल दयाल यांनी हाऊस ऑफ पारले नावानं केली होती. या कंपनीचे २१ प्रोडक्टस बाजारात असून १२५ हून अधिक ठिकाणी कारखाने आहेत. पारले जी बिस्कीट आणि टॉफी शिवाय चॉकलेट, केक, रस्क, स्नॅक्स, ब्रेक फास्ट सीरिअल आणि आटा विक्री करते. याशिवाय हाइड अँड सीक, क्रॅकजॅक, मोनॅको, किस्मी, मलोडी आण पारले रस्क या उत्पादनांची विक्री करते. (Melody Trend and Parle Shares)



पारले इंडस्ट्रीज आणि पारले प्रोडक्टस या कंपन्यांचा एकमेकांशी संबंध नाही. पारले प्रोडक्टस नामांकित एफएमसीजी कंपनी आहे. मात्र, पारले इंडस्ट्रीज ही वेगळी कंपनी असून ती बीएसईवर लिस्टेड आहे. ही कंपनी रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसायकलिंग व्यवसायात कार्यरत आहे. (Melody Trend and Parle Shares)


कंपनीच्या नामसाधार्म्यामुळे हा घोळ झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी पारले इंडस्ट्रीजच्या शेअरची खरेदी केली. हा पेनी शेअर आज 5.25 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचा मेलोडी चॉकलेट तयार करणाऱ्या पारले प्रॉडक्ट्स कंपनीशी कोणताही संबंध नाही. पण पारले नामसाधर्म्याचा तिला फायदा झाला. आज या शेअरला अप्पर सर्किट लागले. (Melody Trend and Parle Shares)




Tags
share marketPM Narendra Moditrendingmelodi trendPrime Minister Giorgia Meloniparle sharesParle Company shares to go up in upper circuit today
Comments
Add Comment

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि

Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद

Amit Shah : शेतकरी, तरुण अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा! सिलीगुडीत तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाला गृहमंत्री अमित शाहंची भेट

सिलीगुडी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडी (Siligudi) येथे 'तीन नवीन फौजदारी

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड