Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन यार्डमध्ये शंटिंग सुरू असताना उज्जयनी एक्सप्रेस अचानक अनियंत्रित झाली आणि इंजिनासह काही डबे भिंत तोडून रुळावरून घसरले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.


ही घटना ऋषिकेशमधील खंड गाव परिसरात घडली. गाडी क्रमांक १४३१७ उज्जयनी एक्सप्रेसची रात्री शंटिंग प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी ट्रेन अचानक वेगाने पुढे सरकली आणि थेट भिंतीवर जाऊन आदळली. धडकेनंतर इंजिन आणि काही चाके रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. (Uttarakhand Train Accident)



सुदैवाने अपघाताच्या वेळी ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. कोणताही प्रवासी किंवा रेल्वे कर्मचारी डब्यांमध्ये नसल्याने मोठी जीवितहानी टळली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला. (Uttarakhand Train Accident)


प्राथमिक तपासात ब्रेक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर रेल्वे अधिकारी, तांत्रिक पथक आणि आरपीएफचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली असून रुळांवरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (Uttarakhand Train Accident)



वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक महेश यादव यांनी सांगितले की, इंजिनची चाके रुळावरून घसरली असून नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर आरपीएफ अधीक्षक सरोज कुमार यांनी सांगितले की, ट्रेन सकाळी सहा वाजता सुटणार होती आणि त्यापूर्वी नियमित शंटिंग सुरू होते. रात्री सुमारे दहा वाजता या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. (Uttarakhand Train Accident)





या घटनेमुळे रेल्वेच्या तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वेळेत परिस्थिती नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. (Uttarakhand Train Accident)



दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून रेल्वे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (Uttarakhand Train Accident)

Comments
Add Comment

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Meerut Husband Murder Case : विषारी साप आणि प्रेमाचा आव! प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट

20 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या हत्येचा कट; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावा मुंबई : उत्तर

Kailash Mansarovar Yatra : मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद; २०० हून अधिक प्रवासी अडकले

नवी दिल्ली : सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ऐतिहासिक

Aadhaar App : आधार ॲपने ओलांडला ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा

नवी दिल्ली : आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल