Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी लढणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा शनिवारी २९ ऑगस्ट रोजी चंदीगडच्या रुग्णालयात मृत्यू झाला. मृत मनजीत कौर सात आठवड्यांची गरोदर असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. याशिवाय तिला सात वर्षांचा एक मुलगा असून तो तिच्या पहिल्या पतीसोबत राहतो. मनजीत कौरचा पतीसोबत घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. (Manjit Kaur)


चंदीगड पोलीस शुभी आणि पिंडा अशी नावे असलेल्या दोन्ही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ जुलै रोजी घडली होती. दोन्ही आरोपींनी मनजीतला एका दारूच्या दुकानाजवळ बोलावले होते. त्यानंतर दोघांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मोरिंडा येथे नेले. तेथील एका निर्जन स्थळी त्यांनी मनजीतला तुतीच्या झाडाला बांधून जबर मारहाण केली आणि त्यानंतर तिला जिवंत जाळलं. मनजीतच्या एका मैत्रिणीने हे दृश्य पाहिलं आणि तिनेच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. (Manjit Kaur)


https://www.prahaar.in/2026/08/30/india-nepal-flood-relief-operation-india-intensifies-relief-efforts-amidst-nepal-floods-108-indian-citizens-safely-rescued/

पुढे मोरिंडाच्या रुग्णालयातून मनजीतला मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. काही दिवसांनंतर तिला पीजीआयमध्ये रेफर करण्यात आले. खरड सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ गुरप्रीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीत कौर गंभीररीत्या भाजली होती. माहिती मिळताच पोलिसांचे पथक रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी मनजीतच्या आईशी संवाद साधला. मनजीतचे कुटुंब सेक्टर ३४ मध्ये राहत होते. कुटुंबाच्या निवेदनावरून पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, मनजीतचे चंदीगडवरून अपहरण करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे चंदीगड पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ती जवळपास दोन महिने रुग्णालयात दाखल होती. या प्रकरणी चंदीगड पोलिसांनी दोन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. (Manjit Kaur)



मनजीत कौर कोण होती ?


मनजीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिने आपल्या अकाउंटवर अनेक व्हिडिओ अपलोड केले होते, ज्यामध्ये युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या व्हिडिओंचा समावेश होता. ती एक मेकअप आर्टिस्ट होती आणि सोशल मीडियावर मेकअप तसेच गाण्यांशी संबंधित व्हिडिओ बनवून शेअर करायची. इंस्टाग्रामवर तिचे सुमारे १.४६ लाख फॉलोअर्स आहेत. खरड सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ गुरप्रीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीत कौर हरियाणाची रहिवासी होती, परंतु सध्या ती खरड येथे भाड्याच्या घरात राहत होती. गुरप्रीत सिंह यांनी सांगितले की, मनजीत कौरचे लग्न झालेले नव्हते आणि काही ओळखीच्या लोकांसोबत तिचा वाद सुरू होता. (Manjit Kaur)

Comments
Add Comment

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक

Chitrakoot Flood : चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीला महापूर; रामघाट परिसर पाण्याखाली, 200 जणांची सुटका

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मंदाकिनी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,

India China Border : भारत-चीन सीमा विवादावर टप्प्याटप्प्याने तोडग्याची तयारी

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सहा दशकांहून जुना सीमा विवाद टप्प्याटप्प्याने सोडवण्याच्या दिशेने हालचाली

FSSAI New Rules : पॅकबंद पदार्थांच्या पाकिटांवर आता दिसणार 'धोक्याचा सिम्बॉल'

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर ताश्याऱ्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पॅकबंद