Minor Girl Abuse Case : धक्कादायक! कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; पित्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता कर्जत मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना कर्जतमध्ये घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मुद्रे खुर्द येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वतःच्या पित्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलाने राहत्या घरी पीडित बालिकेचे कपडे काढून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. १५ मे रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आरोपीने पुन्हा बालिकेचे कपडे काढून तिच्या तोंडावर हात ठेवला. दुखत असल्याने बालिका जोरात “मम्मी-मम्मी” अशी हाक मारू लागल्याने तिची आई जागी झाली. फिर्यादी महिलेने तत्काळ आरोपीला मारहाण करून बालिकेपासून दूर केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. यापूर्वीही १३ मे रोजी रात्री आरोपीने बालिकेसोबत अशाच प्रकारचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.



याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात २२२/२०२६ अन्वये बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ चे कलम ४, ५(एन), ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(एफ), ६५(१) अंतर्गत प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मसपोनि/मनीषा लटपटे ह्या करीत आहेत.



Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून