Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनात प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे आणि 'राष्ट्रप्रथम' या भावनेने एकसंधपणे उभे राहावे," असे जाहीर आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यातील जनतेला केले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका विशेष संदेशाद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आणि या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. आपल्या संबोधनात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना या मोहिमेमागची आर्थिक गणिते सोप्या शब्दात समजावून सांगितली. "पंतप्रधानांच्या या प्रतिपादनामागे इंधन बचत आणि परकीय चलनाची बचत हे दोन मुख्य हेतू आहेत. आपण मोठ्या प्रमाणात सोने आणि इंधन परदेशातून आयात करतो, त्यामुळे आपल्या देशातील पैसा परकीय चलनाच्या रूपात बाहेर जातो. सध्या आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हे संकट ओढवले आहे. अशा कठीण काळात देशाची आर्थिक ताकद मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन सवयींमध्ये छोटे छोटे बदल करून मोठी देशसेवा करावी," असे मुख्यमंत्री म्हणाले.






मुख्यमंत्र्यांनी सुचवले 'पंचसूत्री' उपाय

१) ई-वाहनांचा वापर : नवीन वाहन खरेदी करताना शक्यतो इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) प्राधान्य द्यावे. शहरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रो आणि ई-बसेस यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा.


२) कार पूलिंग आणि 'नो व्हेईकल डे' : वैयक्तिक कार वापरणे अपरिहार्य असल्यास आसपासच्या मित्रांना सोबत घेऊन 'कार पूलिंग' करावे. तसेच, आठवड्यातून किमान एक दिवस 'नो व्हेईकल डे' पाळण्याचा प्रयत्न करावा.


३) वर्क फ्रॉम होम : कोविड काळात आपण सर्वजण घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्यात पारंगत झालो आहोत, गरज भासल्यास कंपन्यांनी तोही पर्याय पडताळून पाहावा.


४) एसीचा मर्यादित वापर : घरातील व कार्यालयातील एसीचे तापमान २४ अंश सेल्सिअसच्या खाली ठेवू नये.


५) विदेशी दौरे टाळा : विनाकारण होणारे परदेश दौरे टाळावेत. त्याऐवजी परदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय मित्रांना भारतामध्येच पर्यटनासाठी आमंत्रित करावे.


आम्ही आमच्यापासून सुरुवात केली!

या मोहिमेवर होणाऱ्या राजकीय टीकेला चोख उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले, "या विषयावर कोणाला काय राजकारण करायचे आहे ते करू द्या, त्यांना उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. परंतु, राज्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही स्वतःपासून सुरुवात केली आहे. मी माझा शासकीय ताफा अर्ध्यावर आणला असून, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सर्व विदेश दौरे तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. सरकार पातळीवर इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून, हे करत असताना उद्योग जगत आणि सर्व संबंधित घटकांचे हित जपले जाईल, त्यांना विश्वासात घेतले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधानांनी देशाला ज्या उंचीवर नेले आहे, त्याला अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने या अभियानाला आपलेसे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Comments
Add Comment

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच