Mumbai Janganana : मुंबईकर गावाला, घराला टाळी आणि बंद घराची पाहणी करायला येणार जनगणनेचे कर्मचारी?

घरयादी व घरगणना मोहिमेला शनिवार पासून प्रारंभ, सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन


मुंबई : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घरयादी व घरगणनेच्या प्रक्रियेला शनिवार, १६ मे २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम १४ जून २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत नियुक्त प्रगणक घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत. प्रगणकांच्‍या घर भेटीदरम्‍यान नागरिकांनी त्यांना अचूक, संपूर्ण व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच, ज्यांनी स्व-नोंदणी केली आहे त्यांनी आपला स्व - गणना क्रमांक प्रगणकांना देणे आवश्यक आहे. घरयादी व घरगणना मोहिमेसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रधान जनगणना अधिकारी आश्विनी भिडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्टीमुळे अनेक कुटुंब गावी गेली आहेत. तर काहीजण बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घराला टाळी लागलेली असणार. त्यामुळे या बंद घरांची पाहणी करायला हे कर्मचारी जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.



जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. अचूक माहितीच्या आधारे शासनाला योग्य नियोजन करता येते आणि नागरिकांपर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवता येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून प्रामाणिक व अचूक माहिती देऊन जनगणना २०२७ च्‍या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. घरयादी व घरगणना ही जनगणनेची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असून, या प्रक्रियेत घरांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची माहिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची नोंद केली जाते. या माहितीच्या आधारे शासन विविध विकास आराखडे, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक असल्‍याचे आश्विनी भिडे यांनी नमूद केले आहे.


जनगणेसाठी संकलित केली जाणारी सर्व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते आणि ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने आणि निःसंकोचपणे योग्य माहिती द्यावी. नागरिकांचे सहकार्य हेच महानगराच्‍या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्‍वासही आश्विनी भिडे यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये