अबू धाबी : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्याची सुरुवात अत्यंत दिमाखदार आणि ऐतिहासिक पद्धतीने झाली आहे. पंतप्रधान मोदींचे विशेष विमान ज्या क्षणी यूएईच्या हवाई हद्दीत दाखल झाले, त्याच क्षणी त्यांच्या सन्मानार्थ आणि सुरक्षेसाठी यूएई हवाई दलाची अत्याधुनिक 'एफ-१६' (F-16) लढाऊ विमाने आकाशात तैनात करण्यात आली. दोन देशांमधील दृढ मैत्री आणि भारताला दिलेला विशेष दर्जा दर्शवण्यासाठी यूएईने ही शाही हवाई सुरक्षा पुरवली. आकाशात पंतप्रधान मोदींच्या विमानाला एस्कॉर्ट (Escort) करणाऱ्या या एफ-१६ विमानांचा एक अतिशय थरारक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबई : मुंबईकरांचे सर्वात जवळचे आणि आवडते वीकेंड डेस्टिनेशन असणाऱ्या अलिबागला भेट देण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ...
शुक्रवारी (१५ मे) पंतप्रधान मोदी यांचे अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीरीत्या आगमन झाले. या दौऱ्याचे राजकीय महत्त्व अधोरेखित करणारी विशेष बाब म्हणजे, स्वतः संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. त्यांनी अतिशय आत्मीयतेने आणि परंपरेनुसार पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. यावेळी विमानतळावर पंतप्रधानांना विशेष 'गार्ड ऑफ ऑनर' (मानवंदना) देऊन सन्मानित करण्यात आले. हवेतील कडेकोट लष्करी सुरक्षा आणि जमिनीवरील हे अभूतपूर्व आदरातिथ्य, भारत आणि यूएई यांच्यातील वाढत्या धोरणात्मक, व्यापारी आणि राजनैतिक संबंधांची स्पष्ट साक्ष देत आहे.






