नवी दिल्ली : पुढील वर्षापासून नीट यूजी परीक्षा संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी दिली. त्यांनी सांगितले की सरकार स्वच्छ, पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रणालीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत प्रधान यांनी आश्वासन दिले की परीक्षेत अनुचित मार्गांचा वापर करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा गटाला कोणतीही सूट दिली जाणार नाही. प्राथमिक तपासात १२ मेपर्यंत असे समोर आले की प्रश्नपत्रिका ‘गेस पेपर’ नेटवर्कच्या आडून लीक करण्यात आली होती. पात्र आणि योग्य विद्यार्थ्यांवर याचा कोणताही परिणाम होऊ नये याला सरकार प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेतील पारदर्शकतेवर भर देत त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही प्रधान यांनी दिली.
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा कशी घेणार?
नीट परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेण्यात येणार म्हणजे परीक्षा केंद्रावर गेल्यावर तुमच्या रोल नंबरनुसार तुम्हाला एक ठराविक संगणक दिला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव या संगणकाला कीबोर्ड जोडलेला नसतो. तुम्हाला स्क्रीनवरील प्रश्नांची उत्तरे फक्त माऊसने क्लिक करून द्यावी लागतात. स्क्रीनवर एका वेळी एक प्रश्न आणि त्याचे ४ पर्याय दिसतील. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकवले, तर परीक्षा संपेपर्यंत तुम्ही ते कधीही बदलू किंवा दुरुस्त करू शकता. देशभरातून २२ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर्स उपलब्ध व्हावेत म्हणून ही परीक्षा वेगवेगळ्या वेळेमध्ये घेतली जाऊ शकते.
प्रवेश प्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाचे कालबद्ध नियोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई: ...
नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या ताब्यात
वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने लातूर येथील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची चर्चा असून, या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत पी. व्ही. कुलकर्णी यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती का, याबाबत सीबीआयकडून सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते.या प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात असून, तपासाच्या कक्षेत आणखी काही व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. .........
नीटची पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) ने केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नीट (यूजी) २०२६ ची पुनर्परीक्षा २१ जून रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. संस्थेने सोशल मीडियावर परीक्षार्थी आणि पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी केवळ एनटीएच्या अधिकृत माध्यमांवर जारी करण्यात आलेल्या माहितींवरच विश्वास ठेवावा. संस्थेने कोणतीही माहिती किंवा मदतीसाठी neet-ug@nta.ac.in हा ई-मेल तसेच ०११-४०७५९००० आणि ०११-६९२२७७०० हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. दरम्यान, काल उशिरा रात्री शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी नीट परीक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या ३ मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर काही अनियमितता समोर आल्यानंतर पुनर्परीक्षेची घोषणा करण्यात आली.






