राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल; मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी आणि तपास यंत्रणांना नवी दिशा देण्यासाठी गृह विभागाने शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मोठा धडाका उडवला. अपर पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश असून मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई या प्रमुख शहरांसह कोकण, कोल्हापूर आणि नाशिक परिक्षेत्राला नवे कारभारी मिळाले आहेत. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गुन्हे शाखा, कायदा-सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नियोजन-समन्वय विभागांमध्येही या निमित्ताने मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन) कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) पदावर बदली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्याकडे राज्य मानवी हक्क आयोगाची जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रशिक्षण विभागातील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई पोलीस दलातही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा यांची मुंबईच्या पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुवेझ हक यांची पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त महेश पाटील यांना पदोन्नती देत विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


दहशतवादविरोधी पथकात महत्त्वाचे फेरबदल


दहशतवादविरोधी पथकातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अपर पोलीस आयुक्त परमजीत दहिया यांची पदोन्नती करून विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. के. मीना यांची बदली कोकण परिक्षेत्रात करण्यात आली आहे.

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना पुण्याचे पोलीस सह आयुक्त करण्यात आले आहे. पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजन शर्मा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र म्हणून नियुक्ती झाली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे आता गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) ची जबाबदारी देण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेची धुरा निशीथ मिश्रा यांच्याकडे


आर्थिक गुन्हे शाखेतही फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे) निशीथ मिश्रा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) पदावर बदली झाली असून, पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले राजेश प्रधान यांची पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे), मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे एस. बी. पाठक यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.

ठाणे आणि नवी मुंबईत स्थिती काय?


- ठाणे आणि नवी मुंबईतही बदल्यांची मालिका पाहायला मिळाली. अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांना ‘इन सिटू प्रमोशन’ देण्यात आले असून तेच ठाणे येथे कार्यरत राहणार आहेत. अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांची नवी मुंबईहून पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई येथे पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे पंजाबराव उगले यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृहनिर्माण महामंडळ येथे पाठविण्यात आले आहे.
याशिवाय, विनायक देशमुख यांची नियंत्रक, वेधमापन पदावर नियुक्ती करण्यात आली असून ज्योती प्रिया सिंह यांना पदोन्नती देत विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईतील पोलीस सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांची पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई येथे बदली झाली असून, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण चौधरी यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी