महाराष्ट्र सरकारकडून विमान इंधनावरील 'व्हॅट'मध्ये ११ टक्क्यांची कपात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; 'एटीएफ'वरील व्हॅट १८ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांवर


मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्र अडचणीत आले असतानाच, महाराष्ट्र सरकारने राज्यातील विमान प्रवाशांना आणि विमान कंपन्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. विमानाच्या इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कर (व्हॅट) १८ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून शुक्रवार, दि. १५ मेपासूनच याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जागतिक संकटामुळे विमान भाड्यात होणारी संभाव्य वाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हवाई हद्दीवरील निर्बंध, विमानांच्या उड्डाणांमधील अनिश्चितता आणि विमानांच्या इंधनाचे (एटीएफ) गगनाला भिडणारे दर यामुळे विमान कंपन्या आर्थिक दबावाखाली आहेत. या कठीण काळात केंद्र सरकारने देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी इंधनाचे दर मर्यादित करणे, विमानतळ शुल्कात कपात करणे आणि आणीबाणीच्या काळात पतपुरवठा वाढवणे अशा अनेक सवलती दिल्या आहेत. मात्र, राज्यांकडून आकारला जाणारा 'व्हॅट' हा विमान कंपन्यांसाठी मोठा खर्च ठरत होता.



केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने संकट काळात इंधनावरील 'व्हॅट' कमी करण्यासाठी सर्व राज्यांशी चर्चा सुरू केली होती. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. महाराष्ट्राने अत्यंत योग्य वेळी घेतलेल्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर भाडेवाढ होत असतानाही राज्यातील विमान भाडे नियंत्रणात ठेवणे शक्य होणार आहे.



राज्यातील २ लाख प्रवाशांना थेट फायदा


देशात सर्वाधिक विमान वाहतूक महाराष्ट्रातून होते. सध्या राज्यात १६ विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, वर्षाला सुमारे ७.५ कोटी तर रोज सरासरी २ लाख प्रवासी राज्यातून विमानाने प्रवास करतात. इंधनावरील कर थेट ११ टक्क्यांनी कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व १६ विमानतळांवरून होणाऱ्या विमान उड्डाणांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. यामुळे विमान कंपन्यांचा परिचालन खर्च कमी होणार असून, त्याचा थेट फायदा सर्वसामान्य विमान प्रवाशांना तिकीट दरात कपात किंवा स्थिरता याद्वारे मिळेल.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य