तिलक वर्मा चमकला, मुंबईने सामना जिंकला; पंजाबचा पाचवा पराभव

धरमशाला : आयपीएल २०२६ मधील ५८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ६ गडी राखून पराभव केला. पंजाबने दिलेले २०१ धावांचे विशाल आव्हान मुंबईने १९.५ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. मुंबईच्या या विजयाचा महानायक ठरला तिलक वर्मा, ज्याने अवघ्या ३३ चेंडूंत नाबाद ७५ धावांची तुफानी खेळी करत सामना शेवटच्या षटकात फिरवला. या पराभवामुळे पंजाब किंग्जच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.


पॉवरप्लेमध्ये मुंबईची भक्कम सुरुवात


धावांचा पाठलाग करताना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या रोहित शर्मा (२५ धावा) आणि रायन रिकल्टन यांनी मुंबईला ५९ धावांची बिनबाद सुरुवात करून दिली. रिकल्टनने अवघ्या २३ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४८ धावांची स्फोटक खेळी केली. नमन धीर (९) आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर मुंबईची स्थिती ३ बाद ८८ अशी झाली होती. अवघ्या ८८ धावांवर ३ विकेट्स गेल्यानंतर सामना पंजाबच्या बाजूने झुकला होता, पण तिलक वर्माने सामन्याचे चित्र पालटले. तिलकने अवघ्या २५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३३ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर शेरफेन रदरफोर्ड (२०) बाद झाल्यानंतर विल्स जॅक मैदानात आला. जॅकने अवघ्या १० चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २५ धावा कुटल्या. त्याने १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर (१९.५ षटक) चौकार मारत मुंबईला १ चेंडू राखून थरारक विजय मिळवून दिला.


पंजाबची अपयशी खेळी


पंजाबला सलग चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तरीही त्यांच्या कामगिरीत काही सुधारणा पाहायला मिळाली नाही. पंजाब किंग्सच्या इम्पॅक्ट खेळाडूने म्हणजेच विष्णू विनोदने अवघ्या ८ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या. त्याच्या या छोट्या आणि महत्त्वपूर्ण खेळीमध्ये १ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता, ज्याच्या जोरावर पंजाबच्या संघाने २०० धावांचा टप्पा गाठला. मुंबईच्या गोलंदाजांसमोर त्यांना अपेक्षित आक्रमक सुरुवात करताच आली नाही. प्रियांश आर्य ( २२) व प्रभसिमरन सिंग ही जोडी ५.३ षटके खेळूनही ५० धावा करू शकली. तर गोलंदाजीतही पंजाब किंग्जकडून अझमतुल्लाह ओमरझाईने ३६ धावांत २ बळी घेतले, तर युझवेंद्र चहलने किफायतशीर गोलंदाजी करत ३२ धावांत १ बळी (रोहित शर्माला क्लीन बोल्ड) मिळवला. मात्र, मार्को जानसेन (४ षटकांत ५५ धावा) आणि झेवियर बार्टलेट (३.५ षटकांत ५३ धावा) हे प्रचंड महागडे ठरले, ज्याचा फायदा मुंबईच्या फलंदाजांनी घेतला.


सामन्याचा संक्षिप्त धावफलक:


पंजाब किंग्ज: २० षटकांत २००/८ (प्रभसिमरन ५७, ओमरझाई ३८; शार्दुल ठाकूर ४/३९, दीपक चहर २/३६)
मुंबई इंडियन्स: १९.५ षटकांत २०५/४ (तिलक वर्मा नाबाद ७५, रायन रिकल्टन ४८, विल्स जॅक नाबाद २५; ओमरझाई २/३६)

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील