Thursday, May 14, 2026

NEET Paper Leak Case : शुभम खैरनारचे कुटुंब नॉट रिचेबल, 'या' मोठ्या कारणामुळे शुभमचा मोठा भाऊही पोलिसांच्या रडारवर

NEET Paper Leak Case :  शुभम खैरनारचे कुटुंब नॉट रिचेबल,  'या' मोठ्या कारणामुळे शुभमचा मोठा भाऊही पोलिसांच्या रडारवर

NEET Paper Leak Nashik Connection : नीट पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत देशभरात सीबीआयने 6 आरोपींना अटक केली आहे. तर देशभरात अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. नाशिकमधून शुभम खैरनार (shubham khairnar), अहिल्यानगरहून धनंजय लोखंडे (dhananjay lokhande), जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. (NEET Paper Leak Nashik Connection)

शुभमच्या मोठ्या भावाकडे गावठी कट्टा

दरम्यान, आता या प्रकरणातील संशयित शुभम खैरनार (shubham khairnar) याचे कुटुंब नॉट रिचेबल (Not reachable) असून त्याच्या कुटुंबाचा इतिहासही समोर आला आहे. नांदगावच्या (Nandgaon) गंगाधरीत शुभमचे कुटुंब वास्तव्यास असून शुभमचा (shubham khairnar) मोठा भाऊ यापूर्वीच एका गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांच्या (Police) रडारवर आहे. शुभमचा मोठा भाऊ नांदगाव (Nandgaon) येथील हमालवाडा भागात मेडिकल स्टोअर (Medical Store) चालवतो. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. (NEET Paper Leak Nashik Connection)

एकाकडे पेपर तर एकाकडे गावठी कट्टा

एका बाजूला भाऊ गुन्हेगारी (Criminal) पार्श्वभूमीशी जोडला गेलेला असताना, दुसरीकडे शुभम आता पेपर फुटीच्या आंतरराज्य रॅकेटमध्ये अडकल्याने खैरनार कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शुभमचे वडील वैद्यकीय क्षेत्रातील अल्प ज्ञानावर आधारित छोटा-मोठा व्यवसाय करतात. त्यांच्याच सांगण्यावरून शुभम वैद्यकीय शिक्षण (Medical education) घेत होता, असे समजते. खैरनार कुटुंबाची (Khairnar family) नांदगाव येथे एक ते दीड एकर शेती असून, वर वर पाहता हे कुटुंब सामान्य बाटते. मात्र, घरातील दोन्ही मुलांचे कारनामे पाहता, या सामान्य कुटुंबाचे (Family) धागेदोरे नेमके कोठे आणि कोणाशी जोडले गेले आहेत, याचा तपास आत्ता सीबीआय करत आहे. (NEET Paper Leak Nashik Connection)

शुभम खैरनार सध्या सीबीआयच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने नाशिक आणि परिसरात कोणाला पेपर पुरवले किंवा त्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या कारवाईनंतर नांदगाव येथील त्याचे संपूर्ण कुटुंब सध्या नॉट रिचेबल (Not reachable)  झाले असून घराला टाळे असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा