Mumbai Local Mega block : मध्य रेल्वेचा सलग तीन दिवस ब्लॉक; अनेक लोकल रद्द!

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेकडून उद्यापासून सलग तीन दिवस रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, याचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे. विद्याविहार स्थानकातील मध्यवर्ती पादचारी पुलाच्या (एफओबी) गर्डर बसवण्याच्या कामासाठी १५ मे ते १८ मेदरम्यान विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कुर्ला ते भांडुपदरम्यान अनेक लोकल सेवांमध्ये बदल करण्यात आले असून काही लोकल फेऱ्या रद्द देखील करण्यात येणार आहेत.


ब्लॉकच्या वेळापत्रकानुसार, शुक्रवारी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत, शनिवारी रात्री १२.१० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत आणि रविवारी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ३.०५ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रात्री ११.३० ते १२.१२ दरम्यान कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.



तसेच कसाऱ्याहून रात्री १० वाजल्यापासून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्यांनाही मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. याशिवाय सीएसएमटीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्यांचा प्रवास कुर्ला येथेच संपवण्यात येणार असून, अप दिशेने येणाऱ्या काही गाड्या ठाणे येथेच थांबवण्यात येतील.


मध्य रेल्वेकडून हे गर्डर लाँचिंगचे काम तीन टप्प्यांत पार पडणार आहे. विद्याविहार स्थानकातील इंटरमीडिएट फूटओव्हर ब्रिजच्या कामासाठी शुक्रवारपासून सलग तीन रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.



तीन दिवसांच्या या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, आधीच उशिराने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यात आता सलग तीन दिवस ब्लॉक घेतला जाणार असल्याने प्रवाशांचे हाल आणखी वाढणार आहेत. विशेषतः रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.


दरम्यान, ब्लॉकच्या काळात काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत. ठाणे येथून रात्री ११.४० वाजता सुटणारी ठाणे-कुर्ला लोकल तसेच पहाटे ४.०४ वाजता सुटणारी ठाणे-सीएसएमटी लोकल रद्द राहणार आहे. तसेच सीएसएमटीहून रात्री ११.३८ आणि १२.२४ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी-ठाणे लोकल गाड्याही रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी