Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिरवणूक 'कॉनटिनेन्टल हाईट्स' टॉवरजवळून जात असताना इमारतीमधून अंडी भिरकावण्यात आल्याचा गंभीर आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून संबंधित प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.


या संपूर्ण घटनेवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. सुमारे ९० टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या देशात हिंदूंच्या सणांवर आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकांवर अशा प्रकारे दगडफेक किंवा अंडीफेक होत असेल, तर ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कायदा पाळण्याची संपूर्ण जबाबदारी केवळ हिंदूंनीच घेतलेली नाही, असा सवाल करत राणे म्हणाले की, अशा प्रकारे हिंदू सणांना लक्ष्य केले जाणार असेल, तर भविष्यात ईद आणि मोहरम हे सणही येणार आहेत, हे संबंधित घटकांनी विसरू नये. अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.



'कायद्याचं पालन फक्त हिंदूंनीच करायचं का ?


राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असताना हिंदू सणांवर आणि त्यांच्या मिरवणुकांवर असे हल्ले होणे ही गंभीर बाब असून हे असले प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याची एकतर्फी जबाबदारी किंवा ठेका केवळ हिंदूंनीच घेतलेला नाही. हिंदू सणांना आणि त्यांच्या भावनांना अशा पद्धतीने लक्ष्य केले जाणार असेल, तर आगामी काळात ईद आणि मोहरम हे सण देखील येणार आहेत, हे लक्षात ठेवावे. धर्मरक्षणासाठी आवश्यकता भासल्यास शस्त्र उचलण्याची मुभा भगवद्गीतेत दिलेली आहे, असा संदर्भ देत त्यांनी अशा चिथावणीखोर कृत्यांचा कडक शब्दांत निषेध केला.



पुढे कसा कार्यक्रम होतो बघा'


"सर्वधर्मसमभाव आणि सेक्युलर गप्पा मारणारे सगळे 'टेपरेकॉर्डर' आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत?" असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला. या घटनेत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाईचा इशारा देताना ते म्हणाले की, हिंदू समाजाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या आणि ज्या इमारतींमध्ये हे 'जिहादी' लपून बसले आहेत, त्या सर्वांची नावे आता आमच्याकडे आली आहेत. अशा प्रकारे हिंदू सणांमध्ये विघ्न आणणाऱ्यांना सोडले जाणार नाही आणि येणाऱ्या काळात या प्रकरणाचा कसा 'कार्यक्रम' होतो, ते सर्वांनाच दिसेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी