CNG Price Hike : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG महाग; आजपासून नवे दर लागू

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांदरम्यान आता सर्वसामान्यांना आणखी एक महागाईचा झटका बसला आहे. मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात अचानक वाढ करण्यात आली असून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये आजपासून नवे दर लागू झाले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) किरकोळ दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे ८२ रुपये प्रति किलो दराने मिळणारा सीएनजी आता ८४ रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे.



आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. जगभरात महागाईने उच्चांक गाठला असून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातही महागाईचा भडका उडताना दिसत आहे. जागतिक बाजारात रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती यामुळे सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.


एमजीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात (MMR) सीएनजीचा सुधारित दर आता ८४ रुपये प्रति किलो झाला आहे. या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक चालकांसह प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



सीएनजी दरवाढीचा थेट परिणाम मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर होणार असल्याचे मानले जात आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून भाडेवाढीची मागणीही करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे १२.८ लाख वाहने सीएनजीवर चालतात. यामध्ये अंदाजे ४ लाख ७० हजार ऑटोरिक्षा, १ लाख ६० हजारांहून अधिक टॅक्सी आणि ५ लाखांपेक्षा जास्त खासगी वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे या दरवाढीनंतर मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी