Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय महिलेची पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सुखरूप सुटका केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक पानसरे सकाळी फिरण्यासाठी गेले असताना त्यांना ही महिला इमारतीच्या पाचव्या मजल्यावर धोकादायक अवस्थेत दिसली. (vikroli)


पानसरे यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक गडाडे, पोलीस कर्मचारी सुधम बिनार आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान राठोड यांनी बचावकार्याची जबाबदारी सांभाळली. पोलिसांनी महिलेची समजूत काढत तिला सुरक्षितपणे खाली आणले. (Suicide News)



सुटकेनंतर महिलेचे समुपदेशन करण्यात आले आणि तिला आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली. (Vikroli News)


दरम्यान, मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःला किंवा आपल्या आसपासच्या व्यक्तीला संकटाच्या परिस्थितीत पाहिल्यास तातडीने मदत घ्यावी. पोलिसांची किंवा आपत्कालीन मदतीची गरज असल्यास 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. (Mumbai Police)



विमानतळावरील चालकाच्या मृत्यूचीही नोंद


याच काळात मुंबई विमानतळावर 54 वर्षीय चालकाच्या मृत्यूची घटना समोर आली होती. वरळी येथील रहिवासी प्रमोद जाधव हे सरकारी अधिकाऱ्यांसाठी चालक म्हणून काम करत होते. त्यांनी टर्मिनल 2 येथील पार्किंगच्या P10 स्तरावरून P4 स्तरावर उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलिसांच्या माहितीनुसार, जाधव हे गेल्या काही काळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. घटनास्थळी पोलिसांना पत्नी आणि मुलीला उद्देशून लिहिलेली मराठीतील चिठ्ठीही सापडली. त्यात आपल्या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, तसेच प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने उपचार सुरू ठेवून थकल्याचे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.


या प्रकरणी सहार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (Mumbai News)

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी