Nashik : नाशिक परिक्षेत्रात हायअलर्ट, राज्यात नाशिकसह चाळीस ठिकाणी एटीएसचे छापे, कारण...

Nashik : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून नाशिकसह राज्यात गोपनीय पद्धतीने मेगा कोम्बिंग ऑपरेशन राबवले आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या महत्त्वपूर्ण इनपुट्सनंतर नाशिक शहर, मालेगाव, जळगाव, पालघर, अकोला आणि अहिल्यानगरसह राज्यात तब्बल ४० हून अधिक ठिकाणी एटीएसने छापे टाकले आहेत. दरम्यान, जुन्या नाशिक भागातून एटीएसने दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून, तिसरा संशयित पसार झाला आहे.



नाशिक परिक्षेत्रात मेगा कोम्बिंग ऑपरेशन


पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरचा (Lahor) कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सध्या दुबईत (Dubai) आहे. आणि दुबईतूनच तो आपले रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो भारतीय तरुणांना चिथावणी देत होता. त्यासोबतच देशविरोधी कारवायांसाठी भडकवत असल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. धक्कादायक म्हणजे या सिंडिकेटमध्ये राज्यातील एकूण ५७ जणांची ओळख पटली आहे. तर त्यापैकी ४७ जणांची प्रत्यक्ष चौकशी केली जात आहे.


गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून राज्यासह नाशिक परिक्षेत्रात मेगा कोम्बिंग ऑपरेशन राबवले. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या महत्त्वपूर्ण इनपुट्सनंतर नाशिक शहर, मालेगाव, जळगाव, पालघर, अकोला आणि अहिल्यानगरसह राज्यात तब्बल ४० हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या नाशिक भागातून (Old Nashik Area) एटीएसने दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून, तिसरा संशयित पसार झाला आहे. ताब्यात घेतलेल्यांना मुंबई एटीएसच्या स्वाधीन केले जाणार आहे. छापासत्रात लॅपटॉप, मोबाईल आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईचे स्वरूप अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. नाशिक आणि मालेगावमधील काही तरुण भट्टीच्या सिंडिकेटशी डिजिटल माध्यमातून जोडले गेल्याचा दाट संशय असल्याने या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



कोण आहे शहजाद भट्टी?


शहजाद भट्टी हा मूळचा लाहोरचा असून गेल्या काही वर्षांपासून तो दुबईतून आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवत आहे. त्याचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी थेट संबंध असून, भारतातील तरुणांना चिथावणी देऊन त्यांना बेकायदेशीर कृत्यांमध्ये ओढणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम