मुंबई : मध्य पूर्वेतील तणावामुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटाचा फटका आता मुंबईकरांच्या खिशाला बसला आहे. अमूल आणि मदर डेअरीने दुधाचे दर वाढवल्यानंतर, आता इंधनाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे आता सीएनजीचा दर ८२ रुपयांवरून ८४ रुपये प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली वाढ आणि देशांतर्गत उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करणे भाग पडल्याचे महानगर गॅसने स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यांतील ही तिसरी मोठी दरवाढ असल्याने सर्वसामान्यांसह व्यावसायिक वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ठाणे : तब्बल १४ वर्षे अजित पवारांच्या मार्गदर्शनात ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी काम केल्यानंतर माजी खासदार आनंद ...
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे १२.८ लाख वाहने सीएनजीवर धावतात, ज्यामध्ये ४.७० लाख रिक्षा, १.६० लाख टॅक्सी आणि ५ लाख खाजगी कारचा समावेश आहे. सीएनजी महागल्यामुळे आता ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी लावून धरली आहे. इंधन वाढीमुळे चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, रिक्षाच्या किमान भाड्यात किमान १ रुपयाची वाढ करावी, अशी मागणी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. केवळ इंधनच नाही, तर वाहनांची देखभाल आणि सुटे भागही महागल्याचे चालकांचे म्हणणे आहे. जर ही भाडेवाढ मंजूर झाली, तर मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक महाग होण्याची शक्यता आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील निलंबित -१४३ वेळा कॉल आणि आर्थिक गुंतवणुकीचा आरोप; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...
रिक्षा- टॅक्सी चालकांवर परिणाम : महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली असून, यामुळे जुना ८२ रुपयांचा दर आता ८४ रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीचा थेट परिणाम मुंबईतील ४ लाख ७० हजार रिक्षा आणि १ लाख ६० हजार टॅक्सी चालकांवर होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले वायूचे दर आणि परिचालन खर्च हे या दरवाढीचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. इंधन महागल्यामुळे रिक्षा संघटनांनी आता किमान प्रवास भाड्यात १ रुपयाची वाढ करण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली आहे.





