आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने श्रीलंकेत होणाऱ्या वनडे तिरंगी मालिकेसाठी १५ सदस्यीय India A अर्थात भारत अ संघाची घोषणा केली आहे. ही मालिका तीन देशांच्या संघांमध्ये खेळली जाणार आहे. मालिकेला आयपीएल संपल्यानंतर ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी २३ वर्षीय तिलक वर्मा (Tilak Varma) याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. यात Sri Lanka A, Afghanistan A आणि India A या संघांचा समावेश आहे. या मालिकेतील सर्व सामने दांबुला येथे खेळले जाणार आहेत. या मालिकेनंतर Sri Lanka A आणि India A संघांदरम्यान दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने गॉल येथे खेळले जातील. या मालिकेसाठी BCCI ने युवा खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले आहे. संघात प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे यांसारख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
वैभव सूर्यवंशीला संधी
आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केल्यापासून वैभव सूर्यवंशी हे नाव सातत्याने चर्चेत आहे. हा १५ वर्षीय खेळाडू सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. यंदाच्या हंगामात त्याने राजस्थानसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यांत ४४० धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने १८ सामने खेळले असून त्यात ६९२ धावा केल्या आहेत. त्याची इंडिया A संघात निवड झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये या मालिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.
CSK : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात सीएसकेने हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती. मात्र संघाने हळूहळू लय पकडली आहे. सीएसकेने आतापर्यंत ११ पैकी ...
तिरंगी मालिकेसाठी India A संघ –
तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी , रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी , निशांत सिंधू , हर्ष दुबे, सूर्याश शेडगे , प्रभुसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशगरा (यष्टीरक्षक), विपराज निगम , यश ठाकूर , युद्धवीर सिंग , अंशुल कंबोज आणि अर्शद खान .
तिरंगी मालिकेचे वेळापत्रक –
९ जून २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ ११ जून २०२६ – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ १३ जून २०२६ – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ १५ जून २०२६ – भारत अ विरुद्ध श्रीलंका अ १७ जून २०२६ – भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ १९ जून २०२६ – अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ






