BBL: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बिग बॅश लीगमधून बाहेर पडण्याच्या चर्चांवर अखेर स्पष्टीकरण दिले आहे. काही माध्यमांमध्ये अशी बातमी आली होती की, वरिष्ठ ऑस्ट्रेलियन खेळाडू जास्त मानधनाच्या मागणीसाठी बिग बॅश लीग (Big Bash League) मध्ये न खेळण्याचा विचार करत आहेत आणि ते SA20 स्पर्धेत खेळण्याचा पर्याय निवडू शकतात. मात्र कमिन्सने सोशल मीडियावर ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले.सध्या कमिन्स आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये आलेल्या अहवालानुसार काही वरिष्ठ खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन समोर मानधन वाढवण्याची मागणी केली होती. या अहवालात कमिन्सला त्या गटाचा नेता असल्याचे सांगण्यात आले होते.
या वृत्ताला उत्तर देताना कमिन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया देत म्हटले की,माझ्याबद्दल SA20 किंवा BBL संदर्भात जे काही लिहिले गेले आहे ते पूर्णपणे बनावट आहे.अहवालात असेही म्हटले गेले होते की खेळाडूंनी २०२७-२८ हंगामातील BBL मध्ये खेळण्यासाठी सुमारे १ मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे ७ कोटी रुपये) मानधनाची मागणी केली आहे.
Australia’s best cricketers may quit the home summer to play in the lucrative South African Twenty20 tournament in January 2028 unless they can be paid salaries of about $1 million each to take part in the Big Bash League https://t.co/Vh5hrBjeay
— Daniel Brettig 🏏 (@danbrettig) May 13, 2026
अँड्रू फ्लिंटॉफ सिडनी थंडरचे नवे मुख्य प्रशिक्षक?
इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू फ्लिंटॉफ याची Sydney Thunder संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्या फ्लिंटॉफ इंग्लंड लायन्स संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. तसेच याआध त्याने The Hundred स्पर्धेतही प्रशिक्षक म्हणून भूमिका काम केले आहे.सिडनी थंडर संघाचे माजी प्रशिक्षक Trevor Bayliss यांनी पाच हंगामात प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात संघाने २०२४-२५ हंगामात BBL च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.दरम्यान, फ्लिंटॉफची नियुक्ती झाल्यास वेळापत्रकाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण डिसेंबरमध्ये इंग्लंड लायन्सचा दक्षिण आफ्रिका दौरा आणि BBL स्पर्धा एकाच कालावधीत सुरू होणार आहेत. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्ड फ्लिंटॉफला सिडनी थंडरमध्ये सामील होण्यासाठी लवकर मोकळे करण्यास तयार असल्याचे समजते.






