संगमनेर : सविस्तर वृत्त असे की, सध्या अकोले तालुक्यात बिबट्या चा वावर वाढलेला आहे. विशेषतः एकाकी वस्ती गाय गोठ्याकडे शिकार करण्यासाठी किंवा आपले भक्ष मिळवण्यासाठी बिबट्या मानवी वस्ती कडे वळत आहे. बिबट्याचा हल्ला झाल्याचे अनेक घटना अकोले तालुक्यात घडल्या आहेत यात मृत्यूच्या घटना देखील घडलेल्या आहेत.असाच एक प्रकार अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी या गावात घडला आहे. मंगल बाळासाहेब गोर्डे ही महिला मुलगा सचिन गोर्डे व सून नीता गोर्डे यांच्यासह गावाच्या पश्चिमेला मळ्यात राहतात. मंगळवार १२ मे रोजी रात्री जवळपास मध्यरात्री दोनच्या सुमारास मंगल गोर्डे यांच्या वस्तीवर बिबट्याने प्रवेश केला. सर्व परिसर सामसूम व गाढ झोपेत असताना बिबट्याने संधी साधली.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली महाबीजचा नवा इतिहास; चार नाविन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती महाबीजकडून नव्याने विकसित दर्जेदार ...
गोर्डे यांच्या गोठ्यात आणखी गाई व नवजात वासरू होते. या वासरावर बिबट्याने थेट हल्ला चढवला. परंतू वासराच्या ओरडण्याने व गायांच्या हंबरड्याने मंगल गोर्डे यांना जाग आली व सुनेला आवाज देऊन गोठ्यात काहीतरी गडबड असल्याचे सांगितले. आपला तरुण मुलगा सचिन हा कामानिमित्त मुंबई येथे गेला होता. अशातच तीन चार महिन्याचे लहान बाळ घरात ठेऊन या दोघी सासू सुनेने गोठ्यात काय आले हे बघण्यासाठी खिडकीतून डोकावले तेव्हा हा बिबट्या गोठ्यात असल्याचे व वासरावर हल्ला करत असल्याचे बघितले. तातडीने सासू सुनेनी प्रसंगावधान राखून बिबट्याला हाकलून लावण्यासाठी प्रतिकार केला. दरवाजा वाजवत खिडक्या वाजवून तसेच थेट मोठ्या धाडसाने घराबाहेर येऊन बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. या दोन्हीही महिलांचा दुर्गाअवतार बघून बिबट्याने थेट माघार घेत वासरू सोडून देण भाग पडले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे ...
बिबट्या आणि या दोन महिलांमध्ये जवळपास अर्धा तास संघर्ष चालला. अखेर या दोन्हीही महिला माघार घेत नाही असे समजून बिबट्याने अखेर वासरू जागेवरच सोडून वस्तीवरून धूम ठोकली. या सर्व घटनेचे व्हिडीओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीही या शेतकरी महिलांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक संपूर्ण तालुक्यातून होत आहे.






