Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटांच्या काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे.



हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता असून, ३१ मे पर्यंत तो केरळमध्ये पोहोचेल. त्यानंतर मान्सूनचा प्रवास पुढे सरकत ५ जून रोजी गोव्यात, ६ जून रोजी कोकणात आणि ७ जूनपर्यंत पुण्यापर्यंत पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे.



हवामान विभागाने एक महत्त्वाची बाब नमूद केली आहे ती म्हणजे, यंदा मान्सूनच्या प्रवासादरम्यान बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ तयार झालेले नाही. चक्रीवादळाचा अडथळा नसल्यामुळे मान्सून कोणत्याही व्यत्ययाविना वेळेत प्रगती करू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



राज्यात तूर्त उन्हाचा तडाखा कायम : मान्सूनची बातमी सुखावणारी असली तरी, पुढील काही दिवस महाराष्ट्रात उन्हाचा कडाका कायम राहणार आहे. १५ मे पर्यंत राज्यातील विविध भागांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. राज्यातील काही भागांत १८ मे पर्यंत तापमान चढेच राहणार असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


सांख्यिकीय पद्धत : २००५ पासून हवामान विभाग केरळमधील मान्सूनच्या आगमनासाठी प्रगत सांख्यिकीय पद्धतीचा वापर करत आहे. जरी विभाग इतर राज्यांसाठी अधिकृत तारखा जाहीर करत नसला, तरी उपलब्ध डेटाच्या आधारे मान्सूनच्या प्रगतीचा अंदाज वर्तवला जातो, जो शेतकऱ्यांसाठी आणि नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

Comments
Add Comment

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील

BRICS : ब्रिक्स प्लस देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी 'न्यायनॉमिक्स' अन् 'न्याय सेतू'

नवी दिल्ली :  ११ व्या ‘ब्रिक्स प्लस लिगल फोरम’च्या उद्घाटनाप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

LPG Pipeline : देशातील सहा राज्यांमध्ये LPG पाइपलाइनचा विस्तार, केंद्राकडून ७ हजार कोटींची गुंतवणूक आणि १,८०० किमी नव्या पाइपलाइनला मंजुरी

नवी दिल्ली : देशातील एलपीजी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.