Mumbai : मुंबईत नदी आणि खाडीच्या पातमुखांना अतिक्रमणांचा विळखा, नाल्यांच्या परिसरात राडारोडा

मुंबई : मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने नाले आणि मिठी नदीच्या सफाई कामाला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात नाल्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारुनही त्यामध्ये कचरा फेकला जातो, तसेच नाल्यांच्या परिसरात वन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील अनेक जागांवर आधीच राडारोडा टाकला जातो. त्यामुळे हाच राडारोडा नाल्यात टाकून गाळाचे वजन वाढवण्याचा प्रयत्न कंत्राटदारांकडून केला जात असल्याची बाब भाजप नेत्यांच्या पाहणीमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे नाल्यांच्या आणि नदींच्या पातमुखाजवळ भराव टाकून बांधलेल्या झोपड्यांवर त्वरीत कारवाई करून खाडीच्या पातमुखाकडे जाणाऱ्या नाल्यांचे रुंदीकरण करण्याचे निर्देश स्थायी समितीने प्रशासनाने दिले.





मुंबई महापालिकेचे सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे पूर्व उपनगरातील उषा नगर नाल्याची पाहणी केली असता ठिकाणी सुरक्षा भिंत उंचीची बनवूनही त्यात कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले.तसेच आसपासच्या जागांवर आधीपासून डेब्रीज टाकल्याचे दिसून आले. तर अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अखत्यरित हा भराव टाकला जात असून नाले बुजवून झोपड्या उभारल्या जात आहे. त्यामुळे पातमुखे अरुंद झाली असून आपण मुंबईत कितीही स्वच्छता केली तरी मुंबईतील या पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होणार नाही. त्यामुळे मागील दहा वर्षांती सॅटेलाईन मॅप पाहून अशाप्रकारच्या नाल्याची रुंदी कमी करणाऱ्या अतिक्रमणांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी खणकर यांनी हरकतीच्या मुदयाद्वारे केली. याला उबाठाचे यशोधर फणसे यांनी पाठिंबा देताना काही दिवसांपूर्वी मोगरा नाल्याची पाहणी सहपालकमंत्र्यांसह भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह सभागृहनेत्यांनी केली होती. परंतु दुसऱ्या दिवसापासून तिथे गाड्या आहेत, पण चालकच दिसून येत नसल्याचे सांगितले.



तर राखी जाधव यांनी कामराज नगर नाला आणि रमाबाई नगर नाल्याचा काही भाग खाडीचा असून त्याठिकाणी भराव टाकला जातो. यावर प्रशासनाचा अंकूश नसून येथील पोलिस चौकी हीच आता ऑक्ट्रॉय चौकी बनली आहे,असा आरोप केला. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी मिठी नदीसह धारावीतील नाल्यांची अद्यापही सफाई न झाल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी कल्व्हर्टचे काम झाले असले तरी पातमुखांचे काम कसे करणार असा सवाल करत मिठी नदीच्य सफाईत प्रशासन आपल्याला धोका देत असल्याचा आरोप केला.


भाजपच्या प्रिती सातम यांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने नालेसफाई कशी होणार याचे सादरीकरण दिले होते, पण तशी सफाई काही होत नसून वालभट नाल्यामध्ये टाकलेला भराव कुणाचा याचा शोध घेण्याचा काम सुरु आहे, मग यातील गाळ कधी काढणार? तसेच धाकड नाल्यावरील अतिक्रमणे हटवून हा नाला रुंद कधी करणार असाही सवाल उपस्थित केला. उबाठाच्या मिनाक्षी पाटणकर यांनी आपल्या विभागात अद्यापही एकाही नाल्याच्या सफाई कामाला सुरुवात न झाल्याचे सांगितले. एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी आपल्या प्रभागातील नाल्यात दगट विटांचा भराव टाकल्यानंतर मी स्वत: पकडून दिले असल्याचे सांगितले. तर श्रध्दा जाधव यांनी नालेनिहाय सफाईची माहिती देण्याची मागणी केली. हरिष भांदीर्गे आणि अश्रफ आझमी यांनी मिठी नदीच्या सफाई कामाला योग्यप्रकारे सुरुवात न झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. प्रकाश दरेकर यांनी आता एवढ्या कमी दिवसांमध्ये सफाई कशी करणार? जादुची कांडी फिरवणार का असा सवाल केला. तर राजेश्री शिरवडकर यांनी आपल्या विभागात एकही नाला नसला तरी आजुबाजुच्या प्रभागातील नाल्यांमुळे माझ्या प्रभागात पाणी साचले जाते. त्यामुळे दादर धारावी नाल्यांतर्गत पंपिंग स्टेशनचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार असा सवाल केला.


पातमुखे करा अतिक्रमण मुक्त - प्रभाकर शिंदे


मुंबईची तुंबई जर पातमुखे अरुंद झाल्यामुळे आणि तिथे अतिक्रमणे झाल्यामुळे होत असेल तर या झोपड्यांवर कारवाई करा आणि ही पातमुख्ये अतिक्रमण मुक्त असे निर्देश दिले. अशाप्रकारे महापालिकेला कारवाई करावीच लागेल. घाटकोपरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या जागेवर भराव टाकून झोपड्या बांधल्या जात असल्यामुळे आपण स्वत: जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच परिमंडळ पाच मध्ये सफाई काम योग्य प्रकारे होत नसून याठिकाण महापालिकेच्यावतीने ही सफाई आपल्याच कामगारांमार्फत केली जावी असेही निर्देश दिले. केवळ सादरीकरणा नको तर प्रत्यक्षात घटनास्थळी काय सफाई होते याकडे अधिकाऱ्यांनी पहावे. त्यामुळे यापुढे तुम्ही सांगाल तिथे नाही तर नगरसेवक सांगेल तिथेच पाहणी केली जाईल,असे सांगत खणकर यांनी उपस्थित केलेला हरकतीचा मुद्दा प्रभाकर शिंदे यांनी राखून ठेवला.

Comments
Add Comment

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष