BMC News : मुंबईतील घटनांवर पाहण्याची महापालिकेची दृष्टी झाली अंधूक

- आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉलची गुणवत्ता खालावली


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील सर्व ठिकाणांवर एकाच वेळी लक्ष ठेवण्यात येणाऱ्या महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉल ही जुनी झाली असून या वॉलची दैनंदिन देखभालही आता बंद झाल्याने ही वॉल केव्हाही कोलॅप्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने पावसाळ्या आधी ही व्हिडीओ वॉल न बसवल्यास येणाऱ्या आपत्कालिन प्रसंगी मुंबईवरील महापालिकेची दृष्टी आता अंधूक होण्याची दाट शक्यता आहे.


मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष आणि परळ येथील पर्यायी नियंत्रण कक्ष येथे सन २०१६मध्ये व्हिडीओ वॉल बसवण्यात आली होती. या व्हिडीओ वॉलवर उपलब्ध असणारे सी सी टिव्ही कॅमेरांद्वारे आपत्ती प्रसंगी मुख्य नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाते. मुंबईतील सुमारे ९ हजार ७०० कॅमेरांचे प्रक्षेण या व्हिडीओ वॉलवर उपलब्ध असून एकाच वेळी ५० ते ६० कॅमेरांचे प्रक्षेपण एकाच वेळेस व्हिडीओ वॉलवर उपलब्ध होते.



या कॅमे-यांच्या प्रक्षेपणासहित व्हिडीओ बॉलवर भारतीय हवामान खात्याचे संकेतस्थळ, डॉपलर रडार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संकेतस्थळ, महानगरपालिकेची भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारीत नियंत्रण आणि समादेशन प्रणाली, पावसाळ्यात पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत विविध ठिकाणी बसवलेले पंप यावर देखरेख ठेवणे, त्यांची सद्यस्थिती आदी बाबींचे प्रक्षेपण एकाचवेळी व्हिडीओ वॉलवर उपलब्ध झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करणे शक्य होते.



परंतु, ही व्हिडीओ वॉल डीएलपी प्रोजेक्टर टेक्नॉलॉजीवर आधारीत असल्याने वॉल वरील उपलब्ध आठही पॅनल जीर्ण झाले असून त्याद्वारे उपलब्ध होणा-या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे. सद्यस्थितीतील व्हिडीओ वॉलच्या आकारमानामुळे सर्व बाबी एकाच वेळी व्हिडीओ वॉलवर पाहण्यासाठी मर्यादा येतात. सद्यस्थितीतील व्हिडीओ वॉल ही गेल्या ९ वर्षांपासून अविरत नियंत्रण कक्षात वापरण्यात येत आहे. असून त्याद्वारे उपलब्ध होणा-या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. परिणामी या व्हिडीओ वॉलवर दिसणारे सीसीटीव्हीचे प्रक्षेपण व इतर बाबी अस्पष्ट दिसतात,असे बोलले जात आहे. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने ही व्हिडीओ वॉल बदलण्याचे काम सुरु असून यासाठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्याची कार्यवाही सुरु आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर ही व्हिडीओ वॉल बसवण्याची कार्यवाही केली जाईल. परंतु ही वॉल बसवण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कार्यवाही लांबणीवर पडल्यास प्रशासनाला ऐन पावसाळ्यात मुंबईतील आपत्कालिन परिस्थितीवर लक्ष ठेवणे कठिण जाणार असून प्रशासन आता यासाठी किती युध्दपातळीवर कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

BMC News : दादर फुल बाजारमधील टाकाऊ फुलांच्या विल्हेवाटीसाठी अद्यायावत तंत्रज्ञान वापरा

- अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतनिधी) टाकाऊ फुलांची विल्हेवाट

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदलले; रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.