Megablock : ठाणे ते वाशी पाच तास रेल्वे सेवा बंद राहणार, तर मध्य रेल्वेवरही रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : 'नीट' परीक्षेमुळे गेल्या रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला होता. मात्र, या रविवारी (१० मे) रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवारी १० मे मे रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी आपल्या मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान, अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत असेल, असं जाहीर करण्यात आले आहे. याचाच अर्थ दोन्ही बाजूने हा मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान आपल्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील, असं प्रशासनाने जाहीर केले आहे.


ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील, माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील, असंही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी १६.०७ पर्यंत वाशी / नेरुळ / पनवेल येथे जाणाऱ्या डाउन लाईन सेवा आणि पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी १६.०९ पर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप लाईन सेवा रद्द राहतील.


पनवेल-मडगांव दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या : उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वेमार्गावर वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने मडगाव जंक्शन–पनवेल दरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११०६ मडगाव जं.–पनवेल विशेष रविवार, १० मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेलला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११०५ पनवेल–मडगाव विशेष सोमवार, ११ मे रोजी सकाळी ५.४५ वाजता पनवेलहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, आडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण येथे थांबणार आहे. गाडीत वातानुकूलित त्रिस्तरीय ३, शयनयान ११, सामान्य ७ आणि एसएलआरचे २ असे एकूण २३ डबे असतील.

Comments
Add Comment

Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश मुंबई : गणेशोत्सवाच्या

Police Department : लोकसंख्या आणि गुन्हेगारीनुसार होणार पोलीस ठाण्यांची नव्याने रचना

- गृह विभागाकडून ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी; मुंबईसाठी ३६२ मनुष्यबळाची मर्यादा, सायबर ठाण्यांसाठी स्वतंत्र

Maha Walkathon : महा वॉकेथॉनमधून जलसंपन्न महाराष्ट्राचा संदेश; राज्यभरात 3 लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक (Sudhakarrao Naik) यांच्या जलसंधारणाच्या कार्याची आठवण ठेवत 21 ऑगस्ट हा दिवस

Shweta Tiwari on Raj Thackeray : "मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का?" श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना थेट परखड सवाल

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिला सोशल मीडियावर अत्यंत अपमानास्पद कमेंट्स आणि अश्लील

Mumbai Crane Accident : कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळली; तीन महिन्यांच्या बाळासह 10 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी