मुंबईतील वरळी येथील सागर पॉईंटजवळ राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (Maha Walkathon,)
यावेळी बोलताना मंत्री संजय राठोड यांनी माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा, असा संदेश दिला. जलसंधारणासारख्या विषयावर केवळ बैठका न घेता थेट नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माती आणि पाणी हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ( Maharashtra Government)
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिला सोशल मीडियावर अत्यंत अपमानास्पद कमेंट्स आणि अश्लील शिवीगाळाचा सामना करावा लागला आहे. ...
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचारातून जलसंधारणाच्या कामांना चालना दिली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत जलसंधारणाची लोकचळवळ मजबूत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले. पाणी ही प्रत्येकाची गरज असून, जलसंधारणाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. (Sachin Ahir)
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते. त्यामुळे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि जमीन सुपीक ठेवण्यासाठी नागरिकांनी जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईतील राज्यस्तरीय वॉकेथॉनची सुरुवात आरे दुग्ध वसाहतीजवळील सागरी किनारा रस्त्यालगतच्या प्रोमेनेडपासून झाली. यावेळी सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जलपूजन आणि जलसंधारणाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर 3 किलोमीटरच्या वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.
अभिनेते पुष्कर श्रोत्री, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, गायक संजू राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मंत्री संजय राठोड यांच्यासह इतर मान्यवरांनीही संपूर्ण 3 किलोमीटर अंतर पायी चालून पूर्ण केले. ( Water Conservation Day)