8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक, पगारवाढीसह ‘या’ मागण्यांवर चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) हालचालींना आता वेग आला असून संरक्षण मंत्रालय, रेल्वे आणि इतर केंद्रीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष लागले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आठवा वेतन आयोग १३ आणि १४ मे रोजी दिल्लीमध्ये कर्मचारी संघटना, युनियन आणि पेन्शनधारक प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेपासून ते भत्ते, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शन सुधारणा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.



कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?


या बैठकीत कर्मचारी संघटना सरकारसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडणार आहेत. त्यामध्ये मूळ वेतनात मोठी वाढ, फिटमेंट फॅक्टर वाढवणे, महागाई भत्त्याची नव्याने गणना, प्रमोशनल इन्क्रिमेंट, तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी सुधारित पेन्शन योजना या मुद्द्यांचा समावेश आहे.


विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर किमान २.८६ किंवा त्यापेक्षा जास्त ठेवण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे या बैठकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.



बैठकीसाठी ऑनलाइन अर्ज अनिवार्य :


आयोगाने स्पष्ट केले आहे की, बैठकीत सहभागी होण्यासाठी कर्मचारी संघटना आणि युनियनना अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे.


अर्ज करताना मेमो आयडी सादर करणे आवश्यक असून विहित प्रक्रिया पूर्ण केलेल्या संघटनांनाच बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक संघटनांनी तयारीला सुरुवात केली आहे.



पुढील १८ महिन्यांत अहवाल?


आठव्या वेतन आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर नवीन वेतनरचना आणि सुधारित पेन्शन लागू होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, भविष्यातही दिल्लीमध्ये अशाच प्रकारच्या बैठका आयोजित केल्या जाणार असून त्याबाबतची माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी आयोगाच्या पुढील निर्णयांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आठव्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या