Sanjeev Arora ED : ईडीची पंजाबच्या उद्योगमंत्र्यांवर पुन्हा धाड; दिल्ली-चंदीगडमध्ये एकाचवेळी छापेमारी, राजकारण तापलं

पंजाब : पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा (Sanjeev Arora) पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या रडारवर आले आहेत. शनिवारी सकाळी ईडीच्या पथकांनी दिल्ली आणि चंदीगडमधील त्यांच्या विविध ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी केली. गेल्या महिन्यात तिसऱ्यांदा झालेल्या या कारवाईमुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी चंदीगडमधील मंत्री अरोरा यांचे अधिकृत निवासस्थान, कार्यालय तसेच हॅम्पटन स्काय रिअॅल्टी लिमिटेडशी संबंधित ठिकाणी तपास मोहीम राबवली. सकाळपासूनच अनेक वाहनांतून पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेत कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्यास सुरुवात केली.



याआधी १७ एप्रिल रोजीदेखील ईडीने परकीय चलन उल्लंघन प्रकरणात अरोरा यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. आता मोहालीतील खरड परिसरात कथित लायझन एजंट नितीन गोहल यांच्या निवासस्थानी झालेल्या कारवाईनंतर या तपासाला आणखी वेग आला आहे.



१०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा संशय:


">ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, संजीव अरोरा यांच्या कंपनीमार्फत १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कथित मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचा संशय आहे. मोबाईल फोनच्या बनावट खरेदी-विक्री आणि निर्यातीच्या व्यवहारांद्वारे दुबईमार्गे पैसा भारतात परत आणल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकाराला ‘राऊंड ट्रिपिंग’ असे म्हटले जाते.



तपास यंत्रणांच्या मते, दिल्लीतील अनेक बनावट कंपन्यांच्या नावावरून जीएसटी बिले तयार करण्यात आली. त्याद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC), जीएसटी रिफंड आणि ड्युटी ड्रॉबॅकचा गैरफायदा घेत सरकारी महसुलाला मोठा फटका देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.


सध्या ईडीची तपास मोहीम सुरू असून येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags
punjabED RaidSanjeev AroraED Raid In Punjab
Comments
Add Comment

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या