Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी


नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निदा खान हिला न्यायालयाने ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत फरार असलेली आरोपी निदा खान हिला ताब्यात घेतले. त्यानंतर आज म्हणजेच शुक्रवार ८ मे रोजी नाशिक रोड न्यायालयात तिला हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने अनेक धक्कादायक दावे केले.



छत्रपती संभाजी नगर पोलिसांची मोठी कारवाई :


पीडितेचे वकील मिलिंद कुरकुटे आणि सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सांगितले की, निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज २ मे रोजीच फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार होती. अखेर छत्रपती संभाजीनगरमधून तिला अटक करण्यात आली. छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. निदा खानला सूर्यास्तानंतर अटक केल्यामुळे न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन तिला नाशिकला आणण्यात आले.



पीडितेचे नाव बदलून ‘हनिया’ ठेवण्यात आल्याचा सरकारी वकीलांचा दावा :


सरकारी पक्षाने न्यायालयात दावा केला की, पीडितेवर धर्मांतरासाठी मानसिक दबाव टाकण्यात आला. तिला बुरखा देण्यात आला तसेच नमाज आणि हिजाबबाबत प्रशिक्षण दिले गेले. पीडितेचे नाव बदलून ‘हनिया’ ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला असून, त्यासंदर्भातील काही कागदपत्रे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले.



आरोपीकडून पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक गोष्टींबाबत दबाव :


तपासात पीडितेच्या मोबाईलमध्ये काही चिथावणीखोर रिल्स आणि लिंक आढळल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. याशिवाय, आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक गोष्टींबाबत दबाव टाकल्याचेही नमूद करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामागे आणखी काही लोक सहभागी आहेत का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.



‘मतीन पटेल’ व्यक्तीकडून निदा खानला आश्रय ?


तपासादरम्यान मालेगावमधील काही लिंक समोर आल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली. तसेच मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत नोकरीसाठी पाठवण्याचे नियोजन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. आरोपीला छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी आश्रय दिला, याचाही तपास सुरू असून ‘मतीन पटेल’ हे नाव समोर आल्याचे सरकारी पक्षाने सांगितले.





दरम्यान, निदा खानचे वकील राहुल कासलीवाल यांनी सरकारी पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले. “बुरखा हा कुठेही सहज उपलब्ध होणारा पोशाख आहे. तसेच मोबाईलवर लिंक पाठवणे किंवा अॅप डाउनलोड करणे ही सामान्य बाब आहे,” असा युक्तिवाद त्यांनी केला.



कासलीवाल यांनी न्यायालयात निदा खान गर्भवती असल्याचे सांगत पोलिस कोठडीचा कालावधी कमी ठेवण्याची मागणी केली. तसेच तिला वैद्यकीय उपचार आणि काळजी घेण्यासाठी तिच्या आईला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने यावर हरकत नोंदवली नाही आणि दिवसातून दोन वेळा आईला भेटण्यास परवानगी दिली. याशिवाय मेडिकल असिस्टंट ठेवण्यालाही मंजुरी देण्यात आली.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.