Sanjay Shirsat Criticized Imtiaz Jaleel : “निदा खानला इम्तियाज जलील यांचा आश्रय”; मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खान (Nida Khan) हिला अखेर छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव परिसरातून अटक करण्यात आली. या अटकेनंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे.


संजय शिरसाट यांनी दावा केला की, “निदा खानला लपवून ठेवण्यात काही लोकांनी मदत केली असून, या प्रकरणात एमआयएमच्या काही नेत्यांची भूमिका संशयास्पद आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, “हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित प्रकरण नसून यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे.”



मंत्री शिरसाट यांच्या मते, निदा खान दीड ते दोन महिने छत्रपती संभाजीनगरमध्येच का थांबली, हा मोठा प्रश्न आहे. “ती दुसरीकडे न जाता नारेगाव परिसरातच का होती? तिला आश्रय कोणी दिला? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.


यावेळी त्यांनी बेरोजगार तरुणांकडे महागड्या दुचाकी, मोबाईल आणि आर्थिक स्रोत कुठून येतात, याचाही तपास व्हावा अशी मागणी केली. “या प्रकरणात आर्थिक व्यवहार आणि काही संघटनांचे संबंध तपासणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.





ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) ने निदा खानला उघड पाठिंबा दिल्याचा आरोप करत शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या चौकशीची मागणी केली. “या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.