Ismail Ahmad Found Dead In PoK : 'ऑपरेशन सिंदूर'च्या वर्धापनदिनी पाकमध्ये मोठा थरार; हाफिज सईदचा उजवा हात आणि 'लष्कर'चा टॉप कमांडर इस्माईल अहमदचा संशयास्पद मृत्यू!

पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) आणि खैबर पख्तुनख्वाच्या सीमेवर शुक्रवारी एक अत्यंत गूढ आणि खळबळजनक घटना घडली. 'मातृभूमी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) एक अतिशय वरिष्ठ कमांडर इस्माईल अहमद (Ismail Ahmad) हा अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आला आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी 'ऑपरेशन सिंदूर'चा (Operation Sindoor) वर्धापन दिन होता, त्याच दिवशी हाफिज सईद (Hafiz Saeed) या कुख्यात दहशतवाद्याच्या अत्यंत जवळच्या साथीदाराचा असा गूढ मृत्यू झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.



कोण होता हा इस्माईल अहमद?




इस्माईल अहमद हा केवळ एक सामान्य दहशतवादी नव्हता, तर तो 'लष्कर-ए-तैयबा'च्या मुख्य कोअर कमिटीचा (सुकाणू समिती) एक अत्यंत महत्त्वाचा सदस्य होता. भारताला, आणि विशेषतः जम्मू-काश्मीरला टार्गेट करण्यासाठी आखण्यात आलेल्या अनेक भयंकर दहशतवादी कटांमध्ये तो थेट सामील होता. गेल्या काही काळापासून भारताने जागतिक स्तरावर हाफिज सईद आणि त्याच्याशी संबंधित दहशतवादी जाळ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आणला आहे. अशा कडक पाळतीखाली आणि तणावपूर्ण वातावरणात इस्माईलचा हा मृत्यू दहशतवादी गोटातील मोठी पडझड मानली जात आहे. इस्माईल अहमदचा मृत्यू ही काही पहिली घटना नाही. गेल्याच महिन्यात पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात 'लष्कर'चा आणखी एक वरिष्ठ कमांडर शेख युसूफ आफ्रिदी याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी भरदिवसा हत्या केली होती. ही पूर्वनियोजित 'टार्गेट किलिंग' (Targeted Killing) असल्याचा संशय स्थानिक प्रशासनाला आहे.



डोंगराळ भागात मारेकऱ्यांचे पलायन


या हत्येचा थरार एखाद्या चित्रपटासारखा होता. पूर्ण तयारीनिशी आलेल्या सशस्त्र मारेकऱ्यांनी आफ्रिदीवर अचानक हल्ला चढवला. त्यांनी अत्यंत जवळून आणि बेछूट गोळीबार केल्यामुळे आफ्रिदीला तिथून पळ काढण्याची कसलीच संधी मिळाली नाही. शरीरात अनेक गोळ्या घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला आणि जागीच ठार झाला. ही कारवाई फत्ते केल्यानंतर सर्व मारेकरी डोळ्यांदेखत तिथल्याच जवळच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात पसार झाले.



सुरक्षित गडावर घुसून मारला होता बिलाल आरिफ सलाफी


या हत्यासत्राची सुरुवात याच वर्षी मार्च महिन्यात झाली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या मुरीदके येथील 'मरकज तैयबा' या दहशतवाद्यांच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुख्यालयात घुसून लष्कर-ए-तैयबाचा आणखी एक मोठा कमांडर बिलाल आरिफ सलाफी याचा खात्मा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ईदची नमाज अदा करून तो बाहेर पडताच काही क्षणांतच अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि नंतर चाकूने भोसकून त्याची निर्घृण हत्या केली होती.

Comments
Add Comment

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा

US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान

Earthquake in Japan : जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक जखमी

टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर