Telangana Shocking Video : भररस्त्यात थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या; व्हिडिओ पहा

तेलंगणातील सूर्यापेट (Telangana Suryapet) जिल्ह्यातील कोदाड येथे बुधवारी रात्री एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना घडली. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर, एका २४ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्याच विभक्त पतीने भररस्त्यात पाठलाग करून निर्घृण खून केला. एका चहाच्या टपरीवर लोकांच्या गर्दीतच या माथेफिरू पतीने तिच्यावर चाकूने वार करत तिची जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी तरुणीचे नाव शिरीषा असे होते. कोदाड येथेच राहणारा आणि पेशाने ट्रक ड्रायव्हर असलेल्या मनिदीपसोबत तिने सहा वर्षांपूर्वी प्रेमापोटी लग्नगाठ बांधली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते आणि या जोडप्याला एक चार वर्षांचा लहान मुलगाही आहे. मात्र, त्यांच्या सुखी संसाराला अचानक गालबोट लागले.



कौटुंबिक छळ आणि घर सोडण्याचा निर्णय




गेल्या वर्षभरापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मनिदीपला दारूचे व्यसन जडले होते. याच दारूच्या नशेत तो शिरीषाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार बेदम मारहाण करत असे. पतीच्या या रोजच्या जाचाला आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पंधरा दिवसांपूर्वी शिरीषाने घर सोडण्याचा कठीण निर्णय घेतला. ती आपला लहान मुलगा घेऊन आंध्र प्रदेशातील जग्गय्यापेट येथे राहणाऱ्या तिच्या मावशीकडे (वेंकम्मा) राहायला गेली. शिरीषाने घर सोडल्यानंतर मनिदीपने थेट कोदाड पोलीस ठाणे गाठले. शिरीषा घरातून जाताना कोणालाही न सांगता आपल्यासोबत काही पैसे घेऊन गेल्याचा आरोप करत त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी समुपदेशनासाठी (काउन्सिलिंग) शिरीषाला कोदाड टाऊन पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.



पोलीस ठाण्यातील अखेरची चर्चा


पोलिसांच्या बोलावण्यावरून बुधवारी संध्याकाळी शिरीषा तिच्या मावशीसोबत पोलीस ठाण्यात हजर झाली. तिथे मनिदीप आणि त्याची आई ज्योती हे देखील उपस्थित होते. पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांच्यात चर्चा झाली, परंतु शिरीषाने आता कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याच्या घरी परत न जाण्याचा ठाम निर्णय घेतला होता. आपण हाच निर्णय गुरुवारी लेखी स्वरूपात पोलिसांना देऊ, असे तिने स्पष्ट केले. पोलीस ठाण्यातील सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर शिरीषा आणि तिची मावशी जग्गय्यापेटला परत जाण्यासाठी बाहेर पडल्या. रस्त्यावर उभ्या राहून त्या ऑटो रिक्षाची वाट पाहत होत्या, मात्र त्यांच्यावर काय प्रसंग ओढवणार आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. रात्रीचे साधारण ८.०५ वाजले होते. त्यांना एक ऑटो मिळाली आणि शिरीषा त्यात बसणारच इतक्यात तिथेच दबा धरून बसलेल्या मनिदीपने अचानक तिच्यावर झडप घातली. त्याने तिला अत्यंत क्रूरपणे ऑटोमधून ओढून बाहेर काढले. मनिदीपचा रौद्र अवतार पाहून शिरीषा प्रचंड घाबरली. मनिदीपने जेव्हा आपल्या खिशातून एक धारदार चाकू बाहेर काढला, तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी शिरीषाने जवळच्याच एका चहाच्या टपरीकडे धाव घेतली. पण मनिदीप थांबला नाही, तो एखाद्या श्वापदासारखा तिच्या पाठीमागे धावला. त्याने तिला गाठले आणि अत्यंत निर्दयीपणे तिच्या छातीवर व खांद्यावर चाकूने सपासप अनेक वार केले.



उपस्थितांचा हतबलपणा आणि शिरीषाचा अंत


हा सर्व थरार उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा आणि मनिदीपला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. रक्ताच्या थारोळ्यात बुडालेली शिरीषा जागीच कोसळली आणि बेशुद्ध पडली. गर्दीचा फायदा घेत आणि हत्येचे हत्यार तिथेच फेकून देऊन आरोपी मनिदीपने घटनास्थळावरून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने शिरीषाला सरकारी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी रात्री ८.३५ वाजता तिला मृत घोषित केले. या भयंकर घटनेनंतर मृत शिरीषाची मावशी वेंकम्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनिदीपवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) (हत्या) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी शवविच्छेदन (ऑटोप्सी) पूर्ण झाल्यानंतर शिरीषाचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुरुवारीच आरोपी मनिदीपला अटक करून ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी