Sunita Ahuja : सुनीता आहुजाची आता ‘लॉकअप २’ मध्ये दमदार एन्ट्री; एकता कपूरच्या शोमध्ये रंगणार नवा ड्रामा

मुंबई : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आता थेट जेलमध्ये जाणार? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. पण हे कोणत्याही पोलीस केसचं प्रकरण नाही. मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा मोठा धमाका होणार असून, सुनीता आहुजा आता चर्चित रिॲलिटी शो ‘लॉकअप २’मध्ये कैदी म्हणून सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.



आपल्या बिनधास्त स्वभावामुळे आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे सुनीता आहुजा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. गोविंदासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी अनेकदा खुलेपणाने भाष्य केलं, तर दुसरीकडे भाचा कृष्णा अभिषेकसोबत अनेक वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद मिटवल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांमध्ये त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.


आता याच सुनीता आहुजा एकता कपूरच्या सुपरहिट ‘लॉकअप २’मध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या सीझनप्रमाणे यंदाचाही सीझन प्रेक्षकांना भरपूर ड्रामा, भांडणं, भावना आणि धक्कादायक खुलासे देणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे यावेळी हा शो थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.



दरम्यान, या नव्या सीझनमध्ये कंगना रनौत पुन्हा जेलरच्या भूमिकेत दिसणार का, की तिच्या जागी बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार एन्ट्री घेणार? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या चर्चांनी आधीच जोर धरला आहे.


सुनीता आहुजांचा स्पष्टवक्तेपणा, त्यांचा बेधडक अंदाज आणि सेलिब्रिटी जगतातील त्यांची लोकप्रियता पाहता, ‘लॉकअप २’मध्ये त्या मोठा धमाका करतील अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. आता त्यांच्या एन्ट्रीमुळे शोमध्ये मनोरंजन वाढणार की नवे वाद निर्माण होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे