BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ सुरू असताना राष्ट्रीय गीताचा अनादर केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), मुंबईच्या वतीने शहरातील सहाही जिल्ह्यांमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन भाजप मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, तर भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. (BJP Yuva Morcha)



दादरमध्ये कार्यकर्त्यांचे आंदोलन :


याच पार्श्वभूमीवर दादर पूर्व येथील श्री स्वामीनारायण मंदिरासमोरही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चे गायन करत राष्ट्रीय गीताच्या सन्मानाचे आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा संकल्प केला. काँग्रेस नेत्यांच्या कृतीविरोधात भाजयुमो कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने तीव्र निषेध नोंदवला. (BJP Yuva Morcha)



‘राष्ट्रीय भावनांचा अपमान सहन करणार नाही’ :


भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधाच्या राजकारणात काँग्रेस आता राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या कथित अवमानापर्यंत पोहोचली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा केलेला अनादर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे.” (BJP Yuva Morcha)


‘वंदे मातरम्’ने स्वातंत्र्यलढ्यात लाखो देशभक्तांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली. ब्रिटिश सत्तेच्या काळात हे गीत गाताना अनेक स्वातंत्र्यसैनिकांना लाठीमार आणि तुरुंगवास सहन करावा लागला, मात्र त्यांनी राष्ट्रभक्तीची भावना सोडली नाही, असेही सिंह यांनी नमूद केले. (BJP Yuva Morcha)



‘राजकीय विरोधालाही मर्यादा असते’ :


राजकीय मतभेद असले तरी राष्ट्रीय भावना आणि देशाच्या गौरवाशी संबंधित विषयांवर राजकारण करू नये, असे आवाहन करत दीपक सिंह म्हणाले की, “राजकीय विरोधालाही एक मर्यादा असते. राजकीय स्वार्थासाठी राष्ट्राचा गौरव आणि राष्ट्रीय भावनांशी खेळ करणे देश कदापि स्वीकारणार नाही.” (BJP Yuva Morcha)


‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी भाजयुमो मुंबई भविष्यातही ठामपणे उभा राहील. राष्ट्रीय भावना आणि देशाच्या गौरवाला ठेच पोहोचविणाऱ्या कोणत्याही मानसिकतेविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (BJP Yuva Morcha)

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची