Pradhan Mantri Mudra Yojana : स्वतःचा व्यवसाय असावा हे अनेकांचं स्वप्न असतं, इच्छाशक्ती असली तरी खिशात पैसे नसतात त्यामुळे अनेकांना याचा फटका बसतो. तुम्हांला देखील व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर प्रधानमंत्री मुद्रा योजना ही तुमच्या मोठ्या फायद्याची ठरू शकते. अनेकांनी या केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा घेतला असून व्यावसाय क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही भारत सरकारची लघु उद्योजकांसाठी, उत्पादक, व्यापारी आणि सेवा क्षेत्रांना ₹20 लाखांपर्यंत (नूतनीकरणानंतर) तारणमुक्त कर्ज देणारी योजना आहे. ही योजना 2015 मध्ये सुरू झाली असून, याद्वारे तरुण उद्योजक आणि महिलांना स्व-रोजगार निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य केले जाते. बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर-कृषी व्यवसायांसाठी या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ पर्यंत या योजनेंतर्गत ५२.३७ कोटी कर्जांचे वितरण करण्यात आले आहे. यामधून सुमारे ३३.६५ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे.
PM Vishwakarma Yojana: सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी ...
कर्ज मर्यादेत वाढ
सुरुवातीला या योजनेत कर्ज म्हणून १० लाख रुपये मिळत होते , मात्र ही रक्कम आता वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. याआधी या योजनेत जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत कर्ज मिळत होते. आता ही मर्यादा वाढवून २० रु लाख करण्यात आली आहे. त्यामुळे तरुण उद्योजक आणि महिलांना मोठी झेप घेण्यास मदत होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ पर्यंत या योजनेंतर्गत ५२.३७ कोटी कर्जांचे वितरण करण्यात आले आहे. यामधून सुमारे ३३.६५ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे.
हमीदाराशिवाय मिळणार कर्ज
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिशु कर्जासाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारची हमी किंवा गॅरंटी द्यावी लागत नाही. तसेच प्रक्रिया शुल्कही आकारले जात नाही. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांसाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरते. व्याजदर बँकांच्या नियमानुसार ठरवले जातात. सामान्यतः मुद्रा कर्जावरील व्याजदर ९ ते १२ टक्क्यांदरम्यान असतात.
कर्जाच्या चार प्रमुख श्रेणी - मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसायाच्या गरजेनुसार चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते.
शिशु कर्ज : या श्रेणीत व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० रु हजारांपर्यंत कर्ज मिळते. नवीन छोट्या व्यवसायांसाठी ही श्रेणी उपयुक्त मानली जाते.
किशोर कर्ज : व्यवसाय वाढवण्यासाठी ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
तरुण कर्ज : स्थिर व्यवसाय असलेल्या उद्योजकांना ५ लाख ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
तरुण प्लस कर्ज : सरकारने सुरू केलेल्या या नव्या श्रेणीत १० लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यासाठी आधी घेतलेले मुद्रा कर्ज यशस्वीरित्या फेडलेले असणे आवश्यक आहे.
मुंबई : उतारवयात आधार असतो तो केवळ आपल्या माणसाचा आणि आपल्या पेन्शनच्या पैशांचा,सरकारी नोकरीत आपली सेवा बजावणाऱ्यांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ...
कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक ?
मुद्रा कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा बँक थकबाकीचा इतिहास नसावा. अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, राहण्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, व्यवसाय योजना, केवायसी कागदपत्रे आणि उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असतो.
अर्ज कुठे करायचा?
मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करता येतो. तसेच ऑनलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी https://www.mudra.org.in/ मुद्रा योजना अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.






