Sunday, August 16, 2026

Ethanol Free Petrol Finder : इथेनॉलमुक्त पेट्रोल हवंय? घरबसल्या असा शोधा तुमच्या जवळचा पंप!

Ethanol Free Petrol Finder : इथेनॉलमुक्त पेट्रोल हवंय? घरबसल्या असा शोधा तुमच्या जवळचा पंप!

नवी दिल्ली : देशभरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर सध्या E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल ब्लेंडिंग धोरणामुळे E20 पेट्रोलचा वापर वाढला आहे. मात्र, जुन्या वाहनांचे मायलेज, इंजिनची कार्यक्षमता आणि काही सुट्या भागांवर होणारा संभाव्य परिणाम याबाबत अनेक वाहनचालकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यामुळे काही जण इथेनॉलमुक्त म्हणजेच E0 पेट्रोल शोधत आहेत. (Ethanol Free Petrol Finder)

सरकारकडून E0 किंवा E10 पुन्हा आणण्याची योजना नाही :

सर्वसामान्य वापरासाठी E0 किंवा E10 पेट्रोल पुन्हा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याची कोणतीही योजना नसल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने संसदेत स्पष्ट केले आहे. मात्र, काही प्रीमियम आणि उच्च ऑक्टेन पेट्रोल प्रकार E20 ब्लेंडिंगच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहेत. यामुळे काही निवडक पेट्रोल पंपांवर इथेनॉलमुक्त प्रीमियम पेट्रोल उपलब्ध आहे. (Ethanol Free Petrol Finder)

कोणते पेट्रोल इथेनॉलमुक्त आहे?

सरकारी तेल कंपन्यांच्या काही प्रीमियम पेट्रोल प्रकारांमध्ये इथेनॉल नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने

Indian Oil – XP100 Bharat Petroleum – Speed100 Hindustan Petroleum – Power100

या 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोलचा समावेश होतो. मात्र, उपलब्धता शहर, पंप आणि सध्याच्या पुरवठ्यानुसार बदलू शकते. (Ethanol Free Petrol Finder)

महाराष्ट्रातील कोणत्या शहरांत मिळते?

महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यासह काही प्रमुख शहरांमधील निवडक पेट्रोल पंपांवर अशा प्रकारचे प्रीमियम पेट्रोल उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि अकोट या शहरांचा समावेश आहे. मात्र, प्रत्येक पेट्रोल पंपावर E0 पेट्रोल मिळेलच असे नाही. त्यामुळे पंपावर जाण्यापूर्वी उपलब्धता तपासणे महत्त्वाचे आहे. (Ethanol Free Petrol Finder)

जवळचा इथेनॉल-फ्री पेट्रोल पंप कसा शोधाल?

तुमच्या परिसरातील E0 किंवा इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पंप शोधण्यासाठी ऑनलाइन साधनांची मदत घेता येऊ शकते.

‘E0 Finder: Ethanol Free Fuel’ ॲपद्वारे :

Google Play Store वरून ‘E0 Finder: Ethanol Free Fuel’ ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये तुमचे GPS/Location सुरू करा. लोकेशनची परवानगी दिल्यानंतर आजूबाजूच्या पंपांची माहिती पाहता येईल. उपलब्ध असल्यास पंपाचा फोन नंबर वापरून E0 पेट्रोलचा साठा आहे का, हे आधीच तपासा. ‘Directions’ पर्यायाद्वारे पंपापर्यंत पोहोचण्यासाठी नकाशाचा वापर करता येईल. (Ethanol Free Petrol Finder)

याशिवाय e20petrol.in वरील Ethanol Free Fuel Finder सारख्या ऑनलाइन मॅपच्या माध्यमातूनही जवळचे पंप शोधता येऊ शकतात.

E20 आणि E0 पेट्रोलच्या किमतीत मोठा फरक :

E20 पेट्रोलची किंमत शहरानुसार साधारण ₹103 ते ₹106 प्रति लिटर असू शकते, तर 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोलची किंमत त्यापेक्षा लक्षणीय अधिक असून काही ठिकाणी ती सुमारे ₹167 प्रति लिटर असू शकते. प्रत्यक्ष किंमत आणि उपलब्धता पंप व शहरानुसार बदलू शकते. (Ethanol Free Petrol Finder)

पंपावर जाण्यापूर्वी ही काळजी घ्या!

इथेनॉलमुक्त पेट्रोलचा साठा हा तेल कंपन्यांच्या पुरवठ्यानुसार बदलू शकतो. त्यामुळे ऑनलाइन मॅपवर पंप दिसत असला तरी प्रत्यक्ष उपलब्धता फोन करून निश्चित करणे अधिक योग्य ठरेल.

तुमच्या वाहनासाठी कोणता पेट्रोल प्रकार योग्य आहे, हे वाहन निर्मात्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणेही महत्त्वाचे आहे. फक्त ‘इथेनॉल-फ्री’ असल्यामुळे प्रीमियम पेट्रोल प्रत्येक वाहनासाठी आवश्यक किंवा अधिक फायदेशीर असेलच असे नाही. (Ethanol Free Petrol Finder)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >