मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असले, तरी ही केवळ एक 'सदिच्छा भेट' होती, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय आणि त्यानंतर मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात काही वेळा दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्याकडे चहा पिण्यासाठी येण्याचे बावनकुळे यांनी कबूल केले होते. त्यानुसार गुरुवारी राज ठाकरे यांनी वेळ दिल्याने ही भेट घेतल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.
१० नवीन जलमार्ग आणि ४५ टर्मिनल्सचे जाळे; महाराष्ट्र सागरी मंडळाचा 'हायके' कंपनीशी करार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रस्ते आणि रेल्वे ...
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मंत्री झाल्यापासून ही भेट प्रलंबित होती. त्यांनी मला चहापानासाठी वेळ दिला आणि आमची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यांनी माझा यथोचित सन्मान केला. ही भेट पूर्णपणे अनौपचारिक होती.
एका महिन्यापूर्वी आनंदाने पर्यटनासाठी निघालेल्या 'एमव्ही होंडियस' (MV Hondius) या क्रूझ जहाजाचे रूपांतर आता एका चालत्या-फिरत्या रुग्णालयात झाले आहे. या ...





