SRH VS PBKS : टॉप स्पॉटसाठी हैदराबाद विरुद्ध पंजाब; हैद्राबादमध्ये रंगणार थरारक सामना !

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज राजीव गांधी स्टेडियमवर टेबल टॉपर्संची लढत होणार आहे. हंगामातील ४९ वा सामना पंजाब विरुद्ध हैदराबाद असा होणार आहे. पंजाबचा विजयरथ थांबला आहे, त्यांना पुन्हा विजयी मार्गावर यायचं आहे. यंदाच्या हंगामात या दोन्ही संघाने चांगली कामगिरी केली आहे. यामुळे हा सामना चाहत्यांसाठी रोमांचक ठरणार आहे.


हे दोन्ही संघ आतापर्यंत या हंगामात सहा-सहा सामने जिंकले आहेत. पंजाबने ९ सामन्यांत ६ सामने जिंकत १३ गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान फटकावले आहे. यात त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला, तर २ सामन्यांत त्यांचा पराभव झाले आहेत. हैदराबादने आपल्या स्फोटक फलंदाजीने यंदाच्या हंगामात ६ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांत त्यांना पराभव पतकरावे लागले आहे. हैदराबाद १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अव्वल स्थान पक्के करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


हेड टु हेड रेकॉर्ड


आयपीएलमध्ये या दोन्ही संघात आतापर्यंत २५ सामने झाले आहेत. यात हैदराबादने पंजाबवर हुकूमत केली आहे. हैदराबादने १७ सामने जिंकले आहेत, तर पंजाबला ७ सामन्यांत विजय मिळाला आहे. हैदराबादला घरच्या खेळपट्टीवर मोठे यश मिळवता आले आहे, ११ सामन्यांत हैदराबादने ९ सामने जिंकले आहेत, तर पंजाबने २ सामने.


कशी असेल खेळपट्टी ?


खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांना अनुकूल मानली जाते. येथे चेंडू बॅटवर सहज येत असल्यामुळे मुक्त फटकेबाजी आणि मोठ्या धावसंख्येला वाव मिळतो. मात्र, शिस्तबद्ध मारा करत दिशा आणि टप्पा राखल्यास गोलंदाजही यश मिळवू शकतात. येथे झालेली मागील लढत दुपारी साडेतीनची होती, त्यामुळे खेळपट्टीचा नूर वेगळा होता. संध्याकाळी साडेसातपासून रंगणाऱ्या सामन्यात परिस्थिती वेगळी असेल. दवाचा परिणाम निर्णायक ठरू शकतो, ज्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी अधिक सोपी होण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाजानुसार सामन्याच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील