नाशिक : नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चांदवड तालुक्यातील (Chandwad Crime ) वडाळी भोई येथे महिला मंडळ अधिकारीला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. योगिता आनंद भोये (३८) असे या चांदवड तालुक्यातील महिला मंडळ अधिकारीचे नाव असून वडिलोपार्जित जमिनीचे रेकॉर्ड व कब्जाबाबत कार्यवाही करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी त्यांनी केली होती, जी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) त्यांना रंगेहात पकडले आहे.
SBI Bank Employee Strike: SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना महत्त्वाची सूचना दिली आहे. बँकिंग संदर्भातील काही ...
नेमकं काय घडलं ?
तक्रारदाराची खडक ओझर शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीच्या कब्जाबाबत वाद निर्माण झाला होता त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेत न्यायालयाकडे दाद मागितली होती. न्यायालयाने तक्रारदाराला कब्जा देण्याबाबत महसूल विभागाला आदेश दिले होते. या आदेशान्वये चांदवड तहसीलदारांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करून तक्रारदाराला न्यायालयाच्या निर्णयान्वये मूळ रेकॉर्ड व कब्जा देण्याबाबत वडाळी भोईच्या मंडळ अधिकारी योगिता भोई यांना आदेशित केले होते. (Chandwad Crime )
या आदेशान्वये कारवाई करून तक्रारदाराला रेकॉर्ड व कब्जाबाबत कार्यवाही करण्याच्या मोबदल्यात भोई यांनी स्वतासाठी तसेच सजा खडक ओझर येथील तलाठी यांच्या नावाने ६० हजार रुपयांची (bribe) मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये निश्चित करण्यात आले. लाचेची ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने भोये यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात (Vadner Bhairav Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : टीसीएस प्रकरणातील चौघांना संशयितांची पोलीस कोठडीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, ...
या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून न्यायालयाचे आदेशाचे अशाप्रकारे लाच घेऊन उल्लंघन झाल्याने एकच चर्चा रंगली आहे. शासकीय कार्यालयात कुठल्याही कामासाठी अधिकारी वा कर्मचारी अथवा त्यांच्यावतीने कुणी लाच मागत असल्यास तसेच भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (Anti-Corruption Department) १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२५३-२५७५६२८, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान ही यशस्वी ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक भारत तांगडे, अपर अधिक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी काम पाहिले. पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी, कॉन्टेबल अनिल गांगोडे व हवालदार प्रमोद चव्हाणके यांचा समावेश होता.





