Wednesday, May 6, 2026

IPL 2026 : प्लेऑफचे ठिकाण झाले पक्के ; बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

IPL 2026 : प्लेऑफचे ठिकाण झाले पक्के ; बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

बंगळुरुमध्ये एकही सामना नाही...तिकीटेमुळे वाद

BCCI UPDATE : आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगामातील अखेरचा साखळी सामना २४ मे ला खेळला जाणारा आहे, तर आता बीसीसीआयकडुन महत्त्वाची अपडेट समोर आाली आहे. २०२६ चा फइनल सामना बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम ऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणर आहे. आयपीएल २०२६ च्या प्लेऑफची सुरुवात २६ मे पासून होणार आहे.आयपीएल २०२५ च्या फाइनलमध्ये बेंगळुरुने पंजाबचा सहा धावांनी पराभाव करत पहिल्यांदा आयपीएलचे विजेतापद झळकवले होते. यामुळे आयपीएलच्या नियमानुसार गतविजेत्या टीमच्या घरच्या मैदानावर पुढच्या हंगामाचा अंतिम सामना खेळला जाईल, मात्र असं आता होणार नाही. यामुळे क्रिकेट वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे.

बेंगळुरुत सामना का नाही होणार ?

आयपीएलच्या नियमानुसार अंतिम सामना बेंगळुरुत खेळला जाणार होता.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबद्दल एक निवेदन दिले असून त्यामध्ये म्हटले, अंतिम सामना आयोजित करण्याची जबाबदारी बंगळुरुवर सोपवण्यात आली होती, पण स्थानिक संघटना आणि प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात आलेल्या मागण्या, या बीसीसीआयच्या नियमावलीच्या बाहेर होत्या ,त्यामुळे अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.

अंतिम सामन्याचे ठिकाण बद्दलण्याचे प्रमुख कारण आमदारांचा तिकीट वाद मानले जात आहे. आयपीएल २०२६ सुरु होण्यापूर्वी कर्नाटकाच्या आमदाराने मागणी केली होती, की आमदार हा लोकप्रतिनिधी असुन त्यांना तिकीटांसाठी रांगेत थांबवे लागु नये, यासाठी प्रत्येक आमदाराला अंतिम सामन्याची किमान पाच तिकीटं मिळावीत. या प्रकरणाची दखल घेत कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या प्रत्येक सामन्याची तीन तिकीटे देणार असे जाहीर केले होते , म्हणून आता चिन्नास्वामी स्टेडियामवर अंतिम सामना होणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले.

आयपीएल २०२६ अंतिम सामना आणि प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक- क्वालिफायर १ – २६ मे २०२६, धर्मशाला एलिमिनेटर – २७ मे २०२६, चंदीगड क्वालिफायर २ – २९ मे २०२६, चंदीगड अंतिम सामना – ३१ मे, २०२६, अहमदाबाद

Comments
Add Comment