सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबईत आढावा बैठक
मुंबई : जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मुंबई येथील शासकीय निवासस्थान मेघदूत येथे अजिंठा परिसरातील पर्यटन विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सदर बैठकीस सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दूल सत्तार उपस्थित होते. तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव विजय पोवार, पर्यटन संचालनालयाचे कार्यकारी अभियंता आकाश चकोर, छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत तसेच संबंधित विभागांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ निमित्त नाशिक महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असताना, या कामांमधील समन्वयाचा अभाव, ...
मृत्यूच्या दाढेतून परतला महाडचा सुपुत्र; कॅन्सरग्रस्त रुग्णाला तब्बल १५ लाखांची मदत मुंबई : कर्करोगासारख्या महाभयंकर आजाराशी लढा देणाऱ्या महाड ...
तसेच अजिंठा व घटोत्कच लेणी परिसरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसह स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने व्यापार संकुल विकसित करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षा व्यवस्था व इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही मंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान शिव स्मारक व भीम पार्क या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार अब्दूल सत्तार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित केलेल्या विषयाबाबत शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे असे देसाई यांनी स्पष्ट केले..






