IPL 2026 DC VS CSK : आयपीएल २०२६ मध्ये आज ४८ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.हा सामना सीएसके विरुद्ध दिल्ली यांच्यात होणार आहे.या दोन्ही संघा साठी हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. गुणवतालिकेत सीएसके सहाव्या तर दिल्ली आठव्या स्थानवर आहे.हे दोन्ही संघात यााधी ११ एप्रिलला चेन्नईच्या मैदानावर लढत झाली होती. त्या सामन्यात संजुच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने दिल्लीला २१२ धावांचे लक्ष्य दिले होते, पण दिल्ली हा लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरली आणि चेन्नईने हा सामन्यात २३ धावाने जिंकला. तर आता दिल्लीकडे या पराभावाचा सूड घेण्यास संधी आहे.
दिल्लीकडून केएल राहुलने सर्वाधिक ९ सामन्यात ५४.१३ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत. पंजाबविरुद्ध १५२ धावंची खेळी ही या हंगामतील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने आता पर्यंत एक शतक आणि ३ अर्धशतक ठोकले आहेत,आणि गोलंदाजी विभागात कर्णधार अक्षर पटेलने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने ९ सामन्यात ९ विकेट्स घेतले आहेत. चेन्नईसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडचे पुनारागमन. त्याने मागील सलग दोन सामन्यात दोन अर्धशतकं झळकावले आहेत. सीएसकेसाठी यष्टीरक्षक संजु सॅमसने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ सामन्यात ३१५ धावा केल्या आहेत, यात त्यानी दोन शतकही झळकावले आहेत. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज ने ९ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत.
हेड टु हेड आयपीएलमध्ये चेन्नई आणि दिल्ली यांच्यात ३२ वेळा लढत झाली आहे, यात चेन्नईने २० वेळा दिल्लीचा पराभाव केला आहे, तर दिल्ली १२ वेळा चेन्नईला मात करु शकली आहे. यामुळे या सामन्यात चेन्नईची शक्यता जास्त मानली जाता आहे.
कशी असेल खेळपट्टी ?
अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी आयपीएलमध्ये फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. येथील सपाट खेळपट्टी आणि लहान बाउंड्री (६०-६६ मीटर) मुळे उच्च-स्कोअरिंग सामने होतात. तथापि, मागील दोन सामन्यांचे निकाल पूर्णपणे भिन्न होते. या खेळपट्टीवर आयपीएलचे १०० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ४८ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर ५१ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. एक सामना रद्द झाला.
संभाव्य प्लेइंग-११
चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि मुकेश चौधरी, कार्तिक शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, काईल जेमीसन, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि टी नटराजन, आशुतोष शर्मा.






