Buldhana Crime News : बुलढाणा हादरला! सामानासाठी आलेल्या घटस्फोटित पत्नीवर पहिल्या पतीचा चाकू हल्ला

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि रक्तरंजित घटना उघडकीस आली आहे. आपल्या पहिल्या पतीच्या घरी घरगुती सामान आणि स्वतःच्या मुलाला आणण्यासाठी गेलेल्या एका घटस्फोटित महिलेवर तिच्या पहिल्या पतीनेच धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.



नेमकी पार्श्वभूमी काय?


मिळालेल्या माहितीनुसार, रिजवान शेख मंजूर आणि नाझिया परवीन असे या पहिल्या दांपत्याचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर नाझिया परवीन हिने शेख शाबीर मोहम्मद शाबीर यांच्यासोबत पुनर्विवाह केला प्राथमिक माहितीनुसार, या दोघांचे आधीपासूनच विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. दुसऱ्या विवाहानंतर नाझिया आणि तिचे नवीन पती शेख शाबीर हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होते.



नेमकी घटना कशी घडली?


नाझिया परवीन यांचा घटस्फोट झाला असला तरी, त्यांचे काही घरगुती सामान आणि त्यांचा मुलगा पहिल्या पतीकडे म्हणजेच रिजवान शेख याच्याकडेच सिंदखेड राजा येथे होता. हेच उर्वरित सामान आणि आपल्या मुलाला सोबत नेण्यासाठी नाझिया सिंदखेड राजा येथे पहिल्या पतीच्या घरी गेल्या होत्या. मात्र, तिथे गेल्यावर आधीचा पती रिजवान शेख याने जुन्या रागातून नाझिया यांच्यावर चाकूने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केला. या भयंकर आणि हिंसक कृत्यात रिजवानच्या इतर दोन नातेवाईकांनीही त्याला सहकार्य केले.



सध्याची परिस्थिती आणि पोलिसांची कारवाई


या हल्ल्यात नाझिया परवीन या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर नाझिया यांचे दुसरे पती शेख शाबीर यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. शेख शाबीर यांच्या तक्रारीच्या आधारे सिंदखेड राजा पोलिसांनी पहिला पती रिजवान शेख आणि त्याला साथ देणाऱ्या इतर दोन नातेवाईकांवर असे एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.



कठोर कारवाईची मागणी


भरदिवसा घडलेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे सिंदखेड राजा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी शेख शाबीर यांनी तिन्ही आरोपींना तात्काळ बेड्या ठोकून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. सिंदखेड राजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग