Ratna Debnath : आर. जी. कार रुग्णालयातील पीडितेच्या आईचा निवडणुकीत विजय

कोलकाता : पश्चिम बंगाल हादरवून टाकणारी घटना काही महिन्यांपूर्वी कोलकाता येथील प्रसिद्ध आर. जी. कार रुग्णालयात घडली होती. एका निवासी डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी शरीराचे तुकडे करण्यात आले होते. या धक्कादायक आणि अमानवी कृत्यामुळे ज्या उदयोन्मुख तरुणीने जीव गमावला तिच्याच आईला भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. ममता बॅनर्जी सरकारने न्याय दिला नाही पण जनता तुमच्या पाठीशी उभी राहील आणि सत्तांतरानंतर न्यायासाठी लढुया याच विचारातून ही उमेदवारी देण्यात आली होती. भाजपच्या या निर्णयाला पाणीहाटी विधानसभा मतदारसंघांतील लाखो मतदारांनी पाठिंबा दिला. यामुळे पीडितेची आई रत्ना देबनाथ विधानसभा निवडणुकीत ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.



याआधी कोलकातामध्ये रत्ना देबनाथ यांच्या मुलीला न्याय मिळावा आणि घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी लाखो तरुण तरुणी रस्त्यावर आले. मोठे आंदोलन झाले. अनेक मोर्चे निघाले. पण ममता बॅनर्जी सरकारला पाझर फुटला नाही. पीडितेला ममता सरकारच्या काळात न्याय मिळाला नाही. अखेर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच राज्यातील यंत्रणेचा अर्थात सिस्टिमचा भाग होण्याचा निर्णय रत्ना देबनाथ यांनी घेतला. भाजपकडून मिळालेली उमेदवारी स्वीकारत त्या निवडणूक रिंगणात उतरल्या. पंतप्रधान मोदींनी रत्ना देबनाथ यांच्यासाठी प्रचार केला. जनतेने भाजपवर विश्वास दाखवत नराधमांना शिक्षा मिळेल अशी खात्री बाळगत रत्ना देबनाथ यांना मते दिली.


पाणीहाटी विधानसभा मतदारसंघात रत्ना देबनाथ यांनी मोठी आघाडी घेतली आहे तर तृणमूल काँग्रेसचे तीर्थांकर घोष पिछाडीवर आहेत. रत्ना देबघोष आणि तीर्थांकर घोष यांच्यातील मतांची तफावत वाढत आहे. विशेष म्हणजे २०११ पासून टीएमसीने अखंडपणे राखलेल्या पाणीहाटी मतदारसंघात देबनाथ यांनी ५६,१६७ हुन अधिक भक्क्कम मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे ममता दीदींच्या पॅटर्नला सुरुंग लागला आहे.



ममता दीदीं विरुद्ध मैदानात


राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या गुन्ह्यांविरुद्ध, गुन्हेगारीविरुद्ध रत्ना यांनी आवाज उठवला, प्रचार सभांदरम्यान आवाज उठवत रत्ना देबनाथ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मुलीच्या नावाने व्यवसाय करताय अशी वक्तव्य, अनेक धमक्या, मारामारी या सगळ्यानंतर जनतेने सर्वांच्या मुलींच्या रक्षणासाठी लढणाऱ्या एका आईच्या पदरात मतांचं दान टाकल आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)