Petrol - Diesel Price : निवडणूक निकालांपूर्वी दिलासा! पेट्रोल-डिझेल दर अद्याप स्थिर

मुंबई : सोमवार ४ मे रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या तरी तेल कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. म्हणजेच, आज पेट्रोल-डिझेल (Petrol - Diesel Price) भरणाऱ्यांना जुन्याच दराने पैसे मोजावे लागणार आहेत.


दरम्यान, निवडणुकीनंतर इंधन दर वाढणार का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या शहरातील आजचे दर जाणून घेणे आणि पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.



देशातील प्रमुख शहरांतील आजचे दर:



  • नवी दिल्ली: पेट्रोल ₹९४.७२, डिझेल ₹८७.६७ प्रति लिटर

  • मुंबई: पेट्रोल ₹१०४.२१, डिझेल ₹९२.१५ प्रति लिटर

  • कोलकाता: पेट्रोल ₹१०३.९४, डिझेल ₹९०.७६ प्रति लिटर

  • चेन्नई: पेट्रोल ₹१००.७५, डिझेल ₹९२.३४ प्रति लिटर

  • बेंगळुरू: पेट्रोल ₹१०२.९२, डिझेल ₹९५.७० प्रति लिटर (Petrol - Diesel Price)



आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढताना दिसत आहेत. ब्रेंट क्रूड सुमारे १०८.३० डॉलर प्रति बॅरलवर स्थिर आहे, तर यूएस क्रूड १०२ डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. या वाढत्या दरांचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Petrol - Diesel Price)


सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ४ ते ५ रुपयांनी वाढ होऊ शकते. एलपीजी सिलेंडरही महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून किरकोळ दर स्थिर ठेवले असले तरी, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे सांगितले जात आहे.(Petrol - Diesel Price)



तथापि, सरकारकडून अद्याप दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून खरेदी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, सध्या दर स्थिर असले तरी निवडणुकीनंतर इंधन दर वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता चर्चेत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल दरांवर सर्वांचे लक्ष लागलेले असेल.(Petrol - Diesel Price)

Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी'

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना