Nashik : शिक्षिकेचं संतापजनक कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, अन तिथेच नको नको ते घडलं...

नाशिक: नाशिक शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गुलशन कॉलनी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे क्लासचालक शिक्षिकेच्याच मदतीने तिच्या भाच्याने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (Nashik Crime News)


नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नाशिकमधील पखाल रोडवरील गुलशन कॉलनीतील एका इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. फिर्यादी मुलगी ही संशयित आरोपी राशेदा राशिद शेख यांच्याकडे शिकवणीसाठी जात होती. त्या दरम्यान,राशेदा शेख (रा.तिसरा माळा, कसक पार्क, गुलशन कॉलनी, पखालरोड, नाशिक) हिने विविध कारणांमधून फिर्यादीला त्यांच्या बेडरूममध्ये पाठवले, तिथे आरोपी सिब्तेन रजा शेख (रा.गरीब नवाज मस्जिदसमोर, मेहबूब नगर, वडाळा गाव, नाशिक) या नराधमाने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. (Nashik Crime News)


आणखी धक्कादायक म्हणजे हा प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी आरोपींनी पीडित मुलीला वेळोवेळी धमकावले आणि प्रलोभनेही दाखवली होती. अखेर वारंवार होत असलेल्या या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने धाडस दाखवले आणि पोलिसांत धाव घेतली. यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोउनि शेख पुढील तपास करत आहेत. (Nashik Crime News)


आरोपी सिब्तेन रजा शेख आणि राशेदा राशिद शेख यांच्या अटकेसाठी पोलीस पथक शोध घेत असून, ते अद्याप फरार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला