BMC News : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची मायक्रोसरफेसिंग सुधारणा

- तब्बल १३५ कोटी रुपये केले जाणार खर्च


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्या ताब्यात आलेल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्त्यांची आता मायक्रो सरफेसिंग तंत्रज्ञानाच्या आधारे सुधारणा करण्यात येणार आहे. या दोन्ही द्रुतगती महामागाच्या मख्य रस्त्याच्या या सुधारणेसाठी तब्बल १३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.



पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग हा एमएमआरडीएच्या ताब्यातून ३ ऑक्टोबर २०२२ रोजी महापालिकेच्या ताब्यात आले. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी यापूर्वी करण्यात आल्यानंतर आता या मुख्य रस्त्याची सुधारणा ही मायक्रो सरफेसिंग तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाणार आहे. या मायक्रो सरफेसिंग ही एक इको फेंण्डली पृष्ठभाग उपचार पध्दत असून या तंत्रज्ञानाचा वापर करून दुरुस्त केलेले डांबरी रस्ते हे एक सिध्द तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आर्थिकदृष्ट्या प्रभावी आहे. यात वापरण्यात येणारे बिटुमीन हे मॉडीफाईड बिटूमिन इमल्शन आहे. जेणेकरून बाईडींग होण्यास मदत होते,असे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



हे पॉलिमर डांबर इमल्शन असून ग्रेडेड एग्रीगेट, सिमेंट, पाणी आणि ऍडिटीव्ह यांचे मिश्रण आहे. हे द्रव अध्रद्रव स्थितीत विशेष फरसबंदी उपकरणाने लावले जाते. विद्यमान डांबरी पृष्ठभाग, जो संरचनात्मकदृष्ट्या समक्ष आहे. परंतु पृष्ठभागाची झीज झालेली आहे,अशा ठिकाणी विदयमान डांबरी भागास कोणताही बदल न करता, मायक्रोसरफेसिंग तंत्रज्ञान वापरुन दोन तासांत वाहतुकीसाठी उपलब्ध होईल,असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.



पश्चिम द्रुतगती महामार्ग : 


एकूण लांबी : २६, एकूण रुंदी: ४२


कंत्राटदार कंपनी: मारकोलाईन्स पेव्हमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनी


कंत्राट रक्कम : ७१. ९७ कोटी रुपये


पूर्व द्रुतगती महामार्ग


एकूण लांबी : १९, एकूण रुंदी: ६०


कंत्राटदार कंपनी : मारकोलाईन्स पेव्हमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनी

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची