पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला अटक केली. तपासादरम्यान आरोपीचे बेकायदेशीर कृत्याचे जुने संदर्भही आढळले आहेत. आरोपीविरोधात पोक्सोसह (POCSO) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शिवाजीनगर कोर्टाने सात मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
आरोपी चिमुरडीला वासरू दाखवतो म्हणत गोठ्यात घेऊन गेला. यानंतर आरोपीने चिमुरडीवर अत्याचार केला. या प्रकरणात आरोपीला फाशी व्हायलाच हवी अशी मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होत आहे. निरागस भाबड्या मुलीला वासरू दाखवायला गोठ्यात नेतो म्हणून तिच्यावर केलेले अत्याचार आणि तिचा खून ही महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी घटना असल्याची भावना समाजाच्या विविध स्तरांतून व्यक्त होऊ लागली आहे.
पुणे : नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. आरोपीला फाशीला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ठोस ...
आरोपीचा कोर्टात अजब दावा
पोलिसांकडून झाली मोठी गफलत
आरोपीला हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी कोर्टासमोर सादर केली पण त्यात आरोपीच्या मागील गुन्ह्याची माहितीच नव्हती. आरोपीचे जुने गुन्हे न टाकल्याने पोलीस प्रशासन झोपेत काम करत आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोर्टाने यावर पुणे ग्रामीण पोलिसांना कडक शब्दात सुनावलं. नंतर पोलिसांनी १५ मिनिटांत तातडीने रिमांडची कॉपी बदलली अन् कोर्टात सादर केली.
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वासरू दाखवण्याच्या बहाण्याने ...
पोलीस कोठडी सुनावली
न्यायालयाने सध्या आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून लवकरच पुणे पोलीस चार्जशीट (आरोपपत्र) सादर करणार आहेत.
आरोपीवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत
आरोपीने १९९८ मध्ये विनयभंगाचा गुन्हा केला होता त्यानंतर २०१५ मध्ये त्याच्यावर पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. पण २०१९ मध्ये त्याची सुटका झाली होती. आता भोर तालुक्यातली केस फास्ट ट्रॅकवर चालणार असून पोलिसांची विशेष टीम यावर तपास करत आहेत. इतक्या संवेदनशील केसवर पोलिसांच्या कारवाई अशी गल्लत असल्याने आणखीच रोष वाढत चालला आहे.




